मुंबई : भारतीय क्रिकेट संघ आणि भारतीय कलाविश्व, त्यातही बॉलिवूड हे नातं काही नवं नाही. किंबहुना त्याबाबत काही वेगळं लिहिण्याचीही गरज नाही. अशा या अनोख्या नात्याची पुन्हा नव्यानं चर्चा सुरु आहे. त्याला निमित्तही तसंच ठरत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फार कमी काळात भारतीय क्रिकेट संघात आपलं स्थान कायम करणाऱ्या आणि फलंदाजीच्या बळावर क्रीडारसिकांची मनं जिंकणाऱ्या क्रिकेटपटू के.एल. राहुल यानं एका खास व्यक्तीसाठी तितकीच खास पोस्ट लिहीली आहे. 


के.एलच्या आयुष्यातील ही खास व्यक्ती म्हणजे त्याची तथाकथित प्रेयसी अथिया शेट्टी. अभिनेता सुनील शेट्टी याच्या मुलीशी राहुलचं नाव गेल्या बऱ्याच काळापासून जोडलं जात आहे. सोशल मीडियावरही त्या दोघांच्याही काही पोस्ट या चर्चांना आणखी वाव देत आहेत. त्यातच राहुलनं नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सर्वांचं लक्ष वेधत आहे. 


निमित्त होतं ते म्हणजे अथियाचा वाढदिवस. या खास दिवसानिमित्त के.एलनं तिच्यासोबतचा एक फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यानं तिचा उल्लेख Mad Child असा केला. त्याची ही पोस्ट पाहून चाहत्यांनीही अथियाला कमेंट ब़ॉक्समध्ये शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. 



 


दरम्यान, अथिया आणि के.एल. या दोघांनीही रिलेशनशिपच्या चर्चांना दुजोरा दिलेला नाही. पण, तरीही व्हायच्या त्या चर्चा काही थांबण्याचं नाव घेत नाही आहेत हेच खरं.