मुंबई : आयपीएल २०१८मध्ये जरी हैदराबादला अंतिम सामन्यात विजय मिळवता आला नाही तरी त्यांच्या एका खेळाडूने साऱ्यांची मने जिंकली. फायनल सामन्यात हैदराबादला चेन्नईने ८ विकेटनी मात दिली. या पराभवाने मात्र हैदराबादला दुसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद मिळवता आले नाही. मात्र या संघातील रशीद खानची यंदाच्या आयपीएलमध्ये जोरदार चर्चा झाली. २०१८मधील त्याला बेस्ट परफॉर्मर म्हणणेही चुकीचे ठरणार नाही. हैदराबादसाठी रशीद खान कठीण काळात ट्रम्प कार्ड म्हणून सिद्ध झालाय. कोलकाताविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात अफगाणिस्तानच्या या स्पिनरने १० चेंडूत ३४ धावा तडकावल्या त्यानंतर गोलंदाजीत जलवा दाखवताना १९ धावांत तीन विकेट मिळवल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशीद खानच्या या कामगिरीनतर सोशल मीडियावर त्याच्यावर स्तुतीसुमने उधळण्यात आली. रशीदच्या या कामगिरीनंतर फॅन्सनी ट्विटरवर त्याला भारतीय नागरिकत्व देण्याची मागणी केली. 


अफगाणिस्तान क्रिकेटच्या विकासात रशीद खानचा मोठा वाटा मानला जातो. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा त्याला त्याच्या स्टेटसबद्दल विचारण्यात आले असता रशीद म्हणाला, जोपर्यंत मला माहीत आहे देशाच्या राष्ट्रपतीनंतर अफगाणिस्तानना मी सगळ्यात लोकप्रिय व्यक्ती आहे.  


राष्ट्रपती अश्रफ गनी यांनी ट्विट करताना म्हटले, अफगाणिस्तानला आपला हिरो रशीद खानवर गर्व आहे. मी भारतीय मित्रांचा आभारी आहे. त्यांनी आमच्या खेळाडूंना चांगला मंच उपलब्ध करुन दिला. अफगाणिस्तानात काय बेस्ट आहे याची आठवण आम्हाला रशीद खान करुन देतो. 



क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरनेही रशीदच्या कामगिरीनंतर त्याचे कौतुक केले. सचिन म्हणाला, रशीद खान जगातील सर्वात उत्तम गोलंदाज आहे. खासकरुन टी-२०मध्ये.



 


रशीद खानने सचिनच्या कौतुकावर आभार व्यक्त केलेत. सचिनने कौतुक केल्याने त्याला प्रचंड आनंद झाला.