मुंबई : सध्या एक खेळाडू जीवन आणि मरणाची लढाई लढतोय. अंडर - १६ पाली उमरीगर ट्रॉफी खेळलेला आदित्य पाठक किडनी फेल्युअरच्या त्रासातून जातोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदित्य पाठकच्या दोन्ही किडन्या खराब झाल्यात. त्याच्या घरची आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नाही... त्यामुळे, कुटुंबीयांना त्याच्यावर उपचार करण्यासाठीही पैसे उभे करायला भारी पडतंय. किडनी ट्रान्सप्लांट करण्यासाठी त्याला आपलं राहतं घरंही गहाण टाकावं लागलंय. 


भारतीय बॉलर आर पी सिंग आदित्यच्या मदतीसाठी सरसावलाय. त्यानं सोशल मीडियातून आदित्यच्या मदतीसाठी आवाहन केलंय. आरपी सिंहनं ट्विटवर एका दैनिकाचं कात्रण शेअर करत मदतीसाठी बँक डिटेल्सही दिलीय. 'गरजवंताना मदत करण्यापेक्षा दुसरं कोणतंही मोठं काम नाही' असं त्यानं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. आर पी सिंगची ही पोस्ट थोड्याच वेळात वायरल झालीय... आणि काही लोक आदित्यच्या मदतीसाठी पुढेही आलेत.



आदित्य पाठकनं उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये कानपूर क्रिकेट असोसिएशनसाठी अम्पायरिंगही केलंय. 
 
यापूर्वी २००९ मध्येही आदित्यची किडनी फेल झाली होती... कसंबसं कुटुंबीयांनी पैसे जमा करून आदित्यवर उपचार केले होते. परंतु, आता पुन्हा एकदा हे संकट उभं राहिल्यानं या कुटुंबावर आभाळच कोसळलंय.