मुंबई : टीम इंडियाचा सलामी फलंदाज शिखर धवन कायमच आपल्या बॅटच्या माध्यमातून प्रेक्षकांना स्तब्ध करत असतो. अनेकदा या फलंदाजीने शिखर धवनने आपल्या संघाला जिंकून दिलं आहे. तसेच फलंदाजीबरोबरच शिखर धवनने आपल्या फिल्डींगमधूनही आपलं वेगळेपण दाखवलं आहे. पण शिखर धवनकडे आपल्या फलंदाजीपेक्षा आणखी एक वेगळी कला चाहत्यांसमोर आणली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


शिखर धवनकडे फलंदाजीबरोबरच बासरी वाजवण्याची देखील कला आहे. शिखरच्या चाहत्यांना हा मोठा धक्का आहे. टीम इंडियाचा खेळाडू आयपीएलमधून आराम करत आहे. हा व्हिडिओ शिखरने स्वतः शेअर केलं आहे. ज्यामध्ये शिखर बासरी वाजवताना दिसत आहे. त्याचं हे रूप पाहून सगळेच हैराण झाले आहे. 



शिखरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. शिखर धवन गेल्या 3 वर्षांपासून बासुरीचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं आहे. ही पोस्ट शेअर करताना शिखर म्हणतो की, मी तुमच्याशी एक गोष्ट शेअर करू इच्छितो. जी माझ्या अगदी जवळची आहे. गेल्या 3 वर्षांपासून मी गुरू वेणुगोपाल यांच्याकडे बासरी वाजवण्याचं शिक्षण घेतं आहे. ही बासरी माझ्या खूप जवळ आहे. मला माहित आहे, अजून मोठा पल्ला गाठायचा आहे.