मुंबई : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. वांद्रे इथे पोलिसांनी कारवाई केली होती. रविवारी त्याच्या सोसायटीच्या गेटवर कारला धडक मारल्याचा आरोप विनोद कांबळीवर आहे. त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विनोद कांबळी याची अवस्था अत्यंत वाईट असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. विनोदने खूप जास्त मद्य घेतल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्याला नीट चालताही येत नाही. 


दारूच्या नशेत विनोद कांबळी धडपडत चालत आहे. त्याला स्वत:चा तोलही सावरता येत नाही. तो अशाच अवस्थेत बाहेर चालत येतो आणि तिथे असलेल्या कारला धडकतो. कार चालक आणि तिथल्या काही लोकांनी त्याला सावरलं. तेव्हा तो तिथे त्यांच्याशी हुज्जत घालताना दिसत आहे. 



या सगळ्या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी विनोद कांबळीवर कारवाई केली आहे. कलम 79, कलम  336 नुसार वैयक्तीत सुरक्षा धोक्यात घालणं आणि कलम 427 नुकसान नुकसान पोहोचवणे या अंतर्गत कारवाई केली आहे. 


 भारतासाठी विनोदने 107 वन डे सामने खेळले आहेत. त्याने 107 वन डे सामन्यात 2477 धावा केल्या. 2 शतक आणि 14 अर्धशतक त्याच्या नावावर आहेत. 17 कसोटी सामन्यात त्याने 1084 धावा करत 4 शतक ठोकले होते.