लेकासोबत युवराज रमतो तेव्हा...; डोळ्यात पाणी आणतोय हा Video
युवराजनं अभिनेत्री हेजल किच हिच्यासह लग्नगाठ बांधत एका नव्या दिशेनं पावलं टाकली
Yuvraj Singh And Hazel Keech: भारतीय क्रिकेट संघानं (Team India) अनेकदा जागतिक पातळीवर दैदिप्यमान कामगिरी केली असतानाच त्या संघाचा भाग असणारा एक खेळाडू म्हणजे, युवराज सिंग. करिअर जोमात असतानाच कर्करोगासारख्या गंभीर आजारानं त्याला ग्रासलं. पण आत्मविश्वाच्या बळावर तो यातूनही सावरला.
पुढे युवराजनं अभिनेत्री हेजल किच हिच्यासह लग्नगाठ बांधत एका नव्या दिशेनं पावलं टाकली. कर्करोगातून सावरत असताना त्याला हेजलचा मोठा आधार राहिला. त्यांच्या नात्याचा हाच मोठा पाया होता.
आता हाच, मैदानावर तुफान फटकेबाजी करणारा युवराज पुन्हा एकदा एक नवी जबाबदारी हाताळण्यासाठी तयार झाला आहे. निमित्त ठरत आहे, ते म्हणजे त्याचा लाडाचा मुलगा.
पत्नी हेजल किच हिनं 9 महिने आई म्हणून आपला प्रवास कसा केला याबाबत सांगताना युवराजनं मुलाच्या जन्मानंतर आपलीही ऑफ फिल्ड जबाबदारी कशी वाढली हेसुद्धा सर्वांना सांगितलं.
युवीचे शब्द आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहता, तोसुद्धा या साऱ्याचा आनंद घेत असल्याचं स्पष्ट झालं. बाळाच्या जन्मानंतर हेजल आणि त्याच्यासोबतचे काही सुरेख क्षण त्यानं एका व्हिडीओतून सर्वांसमोर आणले, आणि तोच व्हिडीओ पाहून अनेकजण भावूक झाले.
युवी आणि हेजल किच यांनी 2016 मध्ये लग्नगाठ बांधली होती. शीख विवाहपद्धतीनं हे लग्न पार पड़लं होतं. मनमिळाऊ वृत्ती आणि सततचा सकारात्मक दृष्टीकोन सोबतीनं ठेवणाऱ्या युवीचं हे नवं रुप तुम्हाला कसं वाटलं?