रोनाल्डोची ऐतिहासिक हॅट्रीक
क्रिस्टियानो रोनाल्डोने रचला नवा इतिहास
मुंबई : फुटबॉल विश्वातला प्रसिद्ध खेळाडू पोर्तुगालचा कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डोने लागोपाठ नवा इतिहास रचला आहे. फिफा वर्ल्डकप ग्रुप बीमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात स्पेन विरुद्ध खेळतांना त्याने शानदार हॅट्रिक लावली. या हॅट्रीकसह त्याने पुन्हा संपूर्ण फुटबॉल चाहत्यांवर आपली छाप सोडली आहे. फिश्ट स्टेडिअममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात चौथ्या मिनिटाला रोनाल्डोने गोल करत 1966 विश्वकपनंतर टूर्नामेंटमध्ये इतक्या जलद गोल केला आहे. इंग्लंडमध्ये 1966 वर्ल्डकपमध्ये जोसे अगुस्तोने हंगरीच्या विरोधात 1:35 सेकेंदमध्ये गोल केला आहे.
या सामन्यात गोल केल्यासोबतच पोर्तुगालचा कर्णधार लागोपाठ आठ प्रमुख आंरराष्ट्रीय टूर्नामेंटमध्ये गोल करणारा पहिला खेळाडू बनला आहे. या प्रमुख आंतरराष्ट्रीय टूर्नामेंटमध्ये वर्ल्डकप, यूरोपीयन चॅम्पियनशिप आणि कोपा अमेरिका यांचा समावेश आहे. रोनाल्डोच्या याआधी यूरोप आणि अमेरिकेचा कोणताही खेळाडू हा कारनामा करु शकलेला नाही.
याशिवाय रोनाल्डोने चार वर्ल्डकप फायनलमध्ये (2006, 2010, 2014 आणि 2018) मध्ये गोल करणारा चौथा खेळाडू आहे. रोनाल्डोच्या आधी पेले, उवे सेलर आणि मिरोस्लाव क्लोज यांनी हा कारनामा केला आहे.