Cristiano Ronaldo, Lionel Messi: वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये (Fifa World Cup) दारूण पराभव स्विकारावा लागल्यानंतर पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो फिका पडत चालल्याचं पहायला मिळतंय. रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) सौदी अरेबियाच्या अल नासर (Al nassr) या क्लबसोबत अडीच वर्षांचा करार केला आणि तो आता अल नासरकडून खेळत आहे. जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू रोनाल्डोला साऊदी सुपर लीगमध्ये (Saudi Super Cup) देखील काही खास कामगिरी करता आली नसल्याचं पहायला मिळतंय. (Cristiano Ronaldo mocked with Lionel Messi celebration as he vents fury in Saudi Super Cup)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोनाल्डो अल नासरने क्लबसाठी पदार्पण सामना (al nassr vs al ittihad) खेळला, त्यात त्याची खूप निराशाजनक कामगिरी राहिली होती. हा सामना अल-इतिहाद संघाविरुद्ध होता, ज्यात रोनाल्डोचा संघ 1-3 ने पराभूत झाला. या सामन्यात रोनाल्डोला (Cristiano Ronaldo) एकही गोल करता आला नाही. त्यामुळे मैदानावरच त्याच्यावर टीका सुरू झाल्याचं पहायला मिळतंय.


आणखी वाचा - Cristiano Ronaldo: भर पत्रकार परिषदेत 'रोनाल्डो'कडून घोडचूक, Al Nassr विषयी बोलताना म्हणाला...; Video व्हायरल!


सामना संपल्यानंतर अल-इत्तिहाद टीमचे (al ittihad) फॅन्सने रोनाल्डोला भडवकण्याचा प्रयत्न केला. रोनाल्डो दिसताच अल-इत्तिहादच्या फॅन्सने मेस्सी मेस्सीचे (Messi Messi) नारे सुरू केले. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या सामन्यात रोनल्डोला दुखापत झाली होती. त्यामुळे तो लंगडत चालत होता.


पाहा Video - 



दरम्यान, त्याने फॅन्सच्या डिवचण्याकडे लक्ष नाही दिलं आणि मान खाली घालून पवेलियनमध्ये निघून गेला. पहिल्या सामन्यात खेळला नाही, म्हणून काय झालं? आगामी सामन्यात तो दणक्यात कमबॅक करेल, असं रोनाल्डोचे फॅन्स म्हणताना दिसत आहेत. पत्रकार परिषदेत (Press conference) रोनाल्डोने सौदी अरेबियाचा उल्लेख दक्षिण अफ्रिका (South Africa) असा केला होता. त्यावेळी देखील मोठा वाद उद्भवला होता.