नवी दिल्ली: जगभरातील फुटबॉल चाहत्यांसाठी रविवारचा दिवस काहीसा दुर्दैवी ठरला. क्रोएशियाई फुटबॉलपटूचा मैदानावर खेळत असताना छातीला बॉल लागून जागीच मृत्यू झाला. खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. ब्रुनो बोबन क्रोएशिएन (वय२५वर्षे) असे खेळाडूचे नाव आहे. तो थर्ड फुटबॉल लिगसाठी मारसोनिया संघाकडून खेळत होता. रविवारी स्लोवोनियाज पोजेगाच्या विरूद्ध खेळताना ब्रुनोच्या छातीला बॉल लागला आणि तो जागेवरच बेशुद्ध पडला. त्यानंतर मैदानावर पोहोचलेल्या वैद्यकीय पथकाने ४० मिनिटांपर्यंत ब्रुनोला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, ब्रुनोने मैदानावरच प्राण सोडला.


ब्रुनोचा मृत्यू हा हृ़दयविकाराच्या झटक्यामुळेच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी आलेल्या शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे की, ब्रुनोचा मृत्यू हा हृ़दयविकाराच्या झटक्यामुळेच झाला. ब्रुनो हा थर्ड डिव्हीजन लिगचा आतापर्यंतचा सर्वोच्च स्कोअरर होता. या लिगमध्ये आतापर्यंत त्याने १२ गोल केले आहेत. ब्रुनो २०१४ ते २०१६ पर्यंत स्लोवेनिजा टीमकडून फुटबॉल खेळला होता. या वर्षाच्या सुरूवातीला त्याने मारसोनिजासोबत करार केला होता. ब्रुनोच्या मृत्यूनंतर अनेक खेळाडूंनी तीव्र दुख: व्यक्त केले होते.



२००८मध्ये क्रोएशिएचाच फुटबॉलपटू हरवोजे कस्टीक याचाही मृत्यू


क्रोएशियाचा आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू मारिया मान्जुकिक यांनी म्हटले की, 'ब्रुनोच्या आत्म्याला शांती मिळावी, माझ्या भावना बोबन परिवार, त्याचे दोस्त आणि त्याचे सहकारी यांच्यासोबत नेहमीच राहतील.' दरम्यान, २००८मध्ये क्रोएशिएचाच फुटबॉलपटू हरवोजे कस्टीक याचाही मृत्यू एका अपघातात झाला होता. एका भींतीला धडकल्याने कस्टीक गंभीर जखमी झाला होता. उपचार सुरू असतानाच ५ व्या दिवशी त्याचा रूग्णालयातच मृत्यू झाला.