MS Dhoni Retirement: महेंद्रसिंह धोनीने वयाच्या 40 वर्षी म्हणजेच 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. त्यानंतर देखील धोनी आयपीएल (IPL 2023) खेळतोय. मात्र, अनेक खेळाडूंनी तसेच दिग्ग्जांनी धोनीच्या निवृत्तीच्या संकेत दिले होते. त्यानंतर आता धोनी देखील जास्त मैदानात धावपळ करताना दिसत नाही. सिंगल धावा घेणं पसंत करतो. त्यामुळे धोनी आता निवृत्ती घेणार का? असे अनेक सवाल विचारले जात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेट प्रॅक्टिसदरम्यान चेन्नई संघाने सलामीवीर डेव्हन कॉनवेसह विकेट कीपिंगचा जोरदार सराव केला दिसतोय. तर अनेक खेळाडूंच्या खांद्यावर धोनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देताना दिसत आहे. त्यामुळे आता धोनी निवृत्तीच्या दिशेने जात असल्याचं समजतंय. अशातच आता चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.


काय म्हणाले चेन्नईचे सीईओ?


आम्हाला आशा आहे की महेंद्रसिंग धोनी आयपीएल खेळत राहील संपूर्ण देशाला तो हवा आहे, असं चेन्नईचे सीईओ काशी विश्वनाथ (CSK CEO Kashi Vishwanath) यांनी म्हटलं आहे. RevSportz च्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलंय.


धोनीनंतर कोण?


धोनीनंतर टीम लीड कोण करणार? असा सवाल विचारला गेल्यावर चेन्नईच्या अधिकाऱ्यांनी मोठं वक्तव्य केलंय. धोनीनंतर कॅप्टन कोण असेल याचा कॉल धोनीने घ्यायचा आहे आणि आम्ही त्याच्या निवडीवर सोडलं आहे, असं चेन्नईच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं.



आणखी वाचा - Darshan Nalkande: हार्दिक पांड्याने काढला 'हुकमी एक्का', मराठमोळा दर्शन नळकांडे आहे तरी कोण?


दरम्यान, गुजरात विरुद्धच्या सामन्यातील धोनीच्या एन्ट्रीला प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. मोहित शर्माच्या बॉलवर फटका मारण्याच्या नादात थाला धोनी फक्त 1 रन करत बाद झाला. चेन्नईच्या डावात चेन्नई सुपर किंग्जने 20 ओव्हरमध्ये 172 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता गुजरात टायटन्स विजयासाठी 173 धावांची गरज आहे. 173 धावांचं आव्हान पूर्ण करून गुजरात टायटन्स फायनलचं तिकीट मिळवणार? की चेन्नई गुजरातचा सुर आवळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.