IPL 2025 Mega Auction: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) या जगप्रसिद्ध टी 20 लीगसाठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबिया येथे मेगा ऑक्शन पार पडलं. या मेगा ऑक्शनमध्ये तब्बल 577 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यापैकी केवळ 182 खेळाडू संघांनी विकेट घेतले. या खेळाडूंना विकत घेण्यासाठी जवळपास 639. 15 कोटी रुपये फ्रेंचायझींनी खर्च केले. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपरकिंग्सने (Chennai Superkings) मेगा ऑक्शनमध्ये संतुलित टीम बनवण्याचा प्रयत्न केला. यात एकीकडे फ्रेंचायझीने संघातील काही प्रमुख खेळाडूंना ऑक्शनपूर्वीच रिटेन केले, तर ऑक्शनमध्ये काही नव्या आणि जुन्या खेळाडूंना संधी देऊन आपला संघ मजबूत केला.  


CSK ने कोणावर खर्च केले सर्वाधिक पैसे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये चेन्नई सुपरकिंग्सने फिरकी गोलंदाजांसाठी सर्वाधिक रक्कम खर्च केली. यात नूर अहमदसाठी 10 कोटी तर रविचंद्रन अश्विनसाठी 9.75 कोटी खर्च केले. तर सीएसकेने मिडल ऑर्डर आणि ऑलराउंड खेळाडूंना देखील ऑक्शनमधून निवडले. यात राहुल त्रिपाठीसाठी 3.40 कोटी, सॅम करन करता 2.40 कोटी रुपये खर्च केले. तर रचिन रवींद्रसाठी RTM कार्ड वापरून 4 कोटी मोजून त्याला संघात घेतले. सीएसकेने डेवोन कॉन्वेसाठी 6.25 कोटी रुपये खर्च केले. 


CSK ने रिटेन केलेलं 5 खेळाडू :


चेन्नई सुपरकिंग्सने आयपीएल 2025 साठी ऑक्शनपूर्वी 5 खेळाडूंना रिटेन केलं होतं. त्यामुळे ऑक्शनसाठी त्यांच्याकडे 1 RTM कार्ड आणि जवळपास 55 कोटी रुपये शिल्लक होते. ऑक्शनपूर्वी ऋतुराज गायकवाड (18 कोटी) , शिवम दुबे (12 कोटी) , रवींद्र जडेजा (18 कोटी), मथीशा पथिराना (13 कोटी) आणि एम एस धोनीला (4 कोटी) रिटेन केले. 


हेही वाचा : 13 वर्षांचा वैभव सूर्यवंशी IPL ऑक्शनमध्ये झाला करोडपती, 'या' संघाने लावली बोली


CSK ने ऑक्शनमधून किती आणि कोणत्या खेळाडूंना घेतलं?


अनुक्रमांक खेळाडूंची नाव खरेदी किंमत कॅप्ड/अनकॅप्ड
1.  नूर अहमद 10 कोटी कॅप्ड
2. रविचंद्रन अश्विन 9.75 कोटी कॅप्ड
3. डेवोन कॉनवे 6.25 कोटी कॅप्ड
4. सैयद खलील अहमद 4.80 कोटी कॅप्ड
5. रचिन रविंद्र 4 कोटी कॅप्ड
6. अंशुल कम्बोज 3.40 कोटी अनकॅप्ड
7. राहुल त्रिपाठी 3.40 कोटी कॅप्ड
8. सॅम करन 2.40 कोटी कॅप्ड
9. गुरजपनीत सिंह 2.20 कोटी अनकॅप्ड
10.  नाथन एलिस 2 कोटी कॅप्ड
11. दीपक हुड्डा 1.70 कोटी कॅप्ड
12. जेमी ओवर्टन 1.50कोटी कॅप्ड
13. विजय शंकर 1.20कोटी अनकॅप्ड
14. वंश बेदी 55 लाख अनकॅप्ड
15. आंद्रे सिद्धार्थ 30 लाख अनकॅप्ड
16. श्रेयस गोपाल 30 लाख अनकॅप्ड
17. रामकृष्ण घोष 30 लाख अनकॅप्ड
18. कमलेश नागरकोटी 30 लाख अनकॅप्ड
19. मुकेश चौधरी 30 लाख अनकॅप्ड
20. शैक रशीद 30 लाख अनकॅप्ड

कोणाच्या हाती CSK चं नेतृत्व? 


आयपीएल 2024 पूर्वी चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार एम एस धोनीने ऋतुराज गायकवाडकडे संघाचं नेतृत्व सोपवलं होतं. ऋतुराजच्या नेतृत्वात सीएसकेने सीजन १७ मध्ये चांगली कामगिरी केली होती. आरसीबीकडून थोडक्यात पराभूत झाल्यामुळे सीएसके सेमी फायनलपर्यंत पोहोचू शकली नाही. आयपीएल 2025 मध्येही चेन्नईचं नेतृत्व हे ऋतुराज गायकवाडकडेच असेल.