ज्युनियर `मलिंगा`ची कमाल; पदार्पणाच्या सामन्यात मलिंगासारख्या हूबेहूब गोलंदाजीने लावले वेड
आयपीएलमुळे (IPL 2022) भारतातलं नवीन टॅलेंट जगासमोर येत आहे. याचीच अनुभूती गोलंदाज उमरान मलिक (Umram Malik) आणि ज्युनियर `मलिंगा` म्हणून प्रसिद्ध असलेल्या मथिशा पाथिरानाच्या (Mathisha Pathirana) कामगिरीतून दिसून येतेय.
मुंबई : आयपीएलमुळे (IPL 2022) भारतातलं नवीन टॅलेंट जगासमोर येत आहे. याचीच अनुभूती गोलंदाज उमरान मलिक (Umram Malik) आणि ज्युनियर 'मलिंगा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या मथिशा पाथिरानाच्या (Mathisha Pathirana) कामगिरीतून दिसून येतेय. या दोन्ही बॉलर्सची आयपीएलमध्ये फार चर्चा सुरु आहे. चेन्नई विरूद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात मथिशा पाथिरानाची गोलंदाजी पाहून संपूर्ण क्रिकेट विश्व आश्चर्यचकित झालेय. लसिथ मलिंगासारखी अत्यंत हूबेहूब बॉलिंग पाहून क्रिकेट चाहत्यांनाच आपल्या डोळ्यावर विश्वास बसेनासा झालाय.
रविवारी चेन्नई (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात, ज्युनियर 'मलिंगा' म्हणून ओळखल्या जाणार्या गोलंदाजाने पदार्पण केले.चेन्नई सुपर किंग्जसाठी त्याने पहिलाच सामना खेळला. पदार्पणाच्या सामन्यातचं पहिल्याच चेंडूवर त्याने आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने पहिल्याचं बॉलवर विकेट घेऊन आपल्या गोलंदाजीचे कौशल्य दाखवल. विशेष म्हणजे ज्युनियर मलिंगा या नावाने प्रसिद्ध असलेल्या मथिशा पाथिरानाने (Mathisha Pathirana) हूबेहूब त्याच्यासारखी गोलंदाजी केली. त्याची ही गोलंदाजी पाहून सर्वच चक्रावले आहेत. मथिशा आपल्या बॉलिंगने संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही, पण पहिल्या सामन्यात आपली छाप सोडण्यात तो नक्कीच यशस्वी झाला
पहिल्याचं बॉलवर विकेट
चेन्नईकडून खेळताना मथिशा सामन्याच्या 7 व्या षटकात गोलंदाजी करण्यास आला होता. यावेळी मथिशाने पहिल्याच चेंडूवर शुभमन गिलला 18 धावांवर बाद केले.त्याने शुबमन गिलला पूर्ण लांबीचा चेंडू टाकला ज्यावर त्याला विकेट मिळाली.
आयसीसी U19 विश्वचषक 2022 मध्ये मथिशाने जगभरात खळबळ माजवलीय. त्याने आतापर्यंत फक्त 2 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने प्रति षटक 8.25 धावांच्या इकॉनॉमी रेटने काही विकेट्स घेतल्यात. या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर त्याने तीन षटकांच्या गोलंदाजीत 2 विकेटस घेतले आहेत.