मुंबई: चेन्नई सुपरकिंग्स संघातील स्टार खेळाडू ऋतुराज गायकवाड आणि प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव एकमेकांना डेट करतात का अशा चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर सुरू झाल्या. याचं कारण होतं सायली संजीव आणि ऋतुराजने एकमेकांच्या सोशल मीडियावर केलेल्या कमेंट्स.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅप्टन कूल धोनीच्या संघातील ऋतुराज गायकवाड IPL 2021 कोरोनामुळे स्थगित झाल्यानं घरी आहे. त्याने अभिनेत्री सायली संजीवने अपलोड केलेल्या फोटोवर  वाह अशी कमेंट केली होती. सायली आणि ऋतुराज बऱ्याचवेळा एकमेकांच्या फोटोंवर कमेंट करताना दिसत आहेत. त्यानंतर सायलीने त्याच्या कमेंटवर हार्टच्या इमोजी पोस्ट केल्यामुळे दोघंही एकमेकांना डेट करतात का? ऋतुराजची विकेट सायली काढणार का? अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या होत्या. 



ऋतुराज आणि सायलीबद्दल सुरू असलेल्या या चर्चांना ऋतुराज गायकवाडने पूर्णविराम दिला आहे. ऋतुराजने या अफवा आहेत. मी आणि माझ्यात निखळ मैत्री आहे. त्यापलिकडे आमच्यात काहीही नाही असंही ऋतुराजनं स्पष्ट केलं आहे. 




'माझी विकेट घेणं किंवा मला क्लिन बोल्ड हे गोलंदाजच करू शकतात. त्याशिवाय कोणी नाही', अशा शब्दात ऋतुराजनं जे सांगायचं आहे ते योग्य पद्धतीनं चाहत्यांपर्यंत पोहोचवलं आहे. त्यावर मात्र सायलीनं सध्यातरी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. 


सायली सध्या शुभमंगलं ऑनलाइन या सीरियलमध्ये मुख्य भूमिकेत काम करताना दिसत आहे. तर ऋतुराज IPL 2021मध्ये चेन्नई संघाकडून खेळताना दिसला होता. सध्या कोरोनामुळे IPLस्थगित करण्यात आले आहेत. हे दोघंही एकमेकांना डेट करतात का याबाबत होणाऱ्या चर्चांना ऋतुराजने पूर्णविराम दिला आहे.