CSK vs GT : आयपीएल 2023 ( IPL 2023 ) मध्ये पहिला क्वालिफायर सामना आज खेळवण्यात येणार आहे. यावेळी चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) विरूद्ध गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यात जी टीम विजयी होईल त्या टीमला थेट क्वालिफायरचं तिकीट मिळणार आहे. मात्र जर पहिल्या क्वालिफायर ( IPL 2023 Playoffs ) सामन्यात पावसाचा खेळ झाला तर? दरम्यान या सामन्यात पाऊस पडला तर काय होईल अशा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गतविजेत्या गुजरात टायटन्सचा ( Gujarat Titans ) सामना हा चार वेळा विजेत्या असलेल्या चेन्नई सुपर किंग्जची ( Chennai Super Kings ) होणार आहे. त्यामुळे या दोन्ही टीम्समध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र जर या सामन्यामध्ये पावसाने खेळ केला, तर त्याचा फायदा थेट गुजरात टायटन्सला ( Gujarat Titans ) मिळणार आहे. 


सामन्यादरम्यान पाऊस आला तर...


जर गुजरात विरूद्ध चेन्नई यांच्या सामन्यात पाऊस आला तर याचा फायदा काही प्रमाणात गुजरात टायटन्सला मिळालेला दिसणार आहे. कारण पावसामुळे हा सामना रद्द करण्यात येऊ शकतो. परिणामी पॉईंट्स टेबलमध्ये अधिक गुण असल्याने गुजरातच्या टीमला थेट फायनलचं तिकीट मिळू शकणार आहे.  


कसं आहे वेदर रिपोर्ट?


हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 23 मे रोजी चेन्नईचं हवामान सामन्य राहणार असल्याची माहिती आहे. चेन्नईमध्ये कमाल तापमान 36 अंश तर किमान तापमान 31 अंश राहणार आहे. त्यामुळे या ठिकाणी पावसाची शक्यता नाही. त्यामुळे दोन्ही टीमला पावसामुळे कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाहीये. 


टॉस जिंकणं पडणार पथ्यावर


चेपॉकच्या मैदानावर आतापर्यंत एकूण 7 सामने खेळवण्यात आलेत. या मैदानावर दुसऱ्या डावात दव पडतं असा अनुभव आहे. त्यामुळे टॉस जिंकणारी टीम प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेईल अशी दाट शक्यता आहे. दव पडत असल्याने दुसऱ्या डावात गोलंदाजांना गोलंदाजी करताना अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणूनच रन्सचा पाठलाग करणं या मैदानावर अधिक फायद्याचं मानलं जातंय.


गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेईंग इलेव्हेन - रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी, मोहित शर्मा आणि यश दयाल. 


चेन्नई सुपर किंग्सची संभाव्य प्लेईंग इलेव्हेन - रुतुराज गायकवाड, डेवोन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, शिवम दूबे, मोइन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), दीपक चाहर, तुषार देशपांडे आणि महेश तीक्षणा.