मुंबई : चारवेळा ट्रॉफी जिंकलेल्या चेन्नई टीमचा पुन्हा एकदा हिरमोड झाला. पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. गुजरात विरुद्ध झालेल्या सामन्यात 3 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला. यंदाच्या हंगामात चेन्नईनं केवळ एकच सामना जिंकला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरात विरुद्धच्या पराभवानंतर प्ले ऑफमधून चेन्नई बाहेर जाणार हे निश्चित झालं आहे. रविंद्र जडेजानं पराभवानंतर मोठं विधान दिलं. यावेळी तो टीममधील खेळाडूंवर संतापला होता. 


टीममधील बॉलर्सनी डेथ ओव्हरमध्ये अपेक्षेप्रमाणे बॉलिंग केली नाही. त्यामुळे सामना हातून गेला असं जडेजा बोलताना म्हणाला. आम्ही सुरुवात चांगली केली. पावर प्लेमध्ये बॉलिंग आणि बॅटिंगही चांगली आहे. यांचं श्रेय मिलरला जातं. त्याने बॅटिंगमध्ये खूप चांगले शॉट्स खेळले. 


शेवटच्या 5 ओव्हरमध्ये नियोजित प्लॅन फसला. जॉर्डन अनुभवी बॉलरवर भरवसा ठेवला पण त्याने आमच्या अपेक्षा भंग केल्या. त्याने थेट ओव्हरमध्ये अत्यंत वाईट कामगिरी केली त्यामुळे पराभवाचा सामना करावा लागला. 


चेन्नईनं 170 धावांचं आव्हान दिलं. या लक्षाचा पाठलाग करताना 16 धावांवर 3 गडी गमावले. डेव्हिड मिलरने 51 बॉलमध्ये 8 चौकार आणि 6 षटकार ठोकत 94 धावांची खेळी केली. गुजरातने 7 विकेट्स गमवून 170 धावांचं लक्ष्य पूर्ण केलं. 


जॉर्डनमुळे चेन्नईचा पराभव?
ड्वेन ब्रावोने 23 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या तर स्पिनर महेश तीक्षणाने 24 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या. जॉर्डन मात्र सपशेल फेल ठरलाय त्याने 3 ओव्हर 5 बॉलमध्ये 58 धावा दिल्या.