IPL वर CID ची नजर, टीम इंडियातील स्टार प्लेअरच्या फ्लॉप शोचं शोधणार कारण?
गुजरात विरुद्ध चेन्नई सामन्यानंतर स्टार खेळाडू का होतोय एवढा ट्रोल? नक्की काय प्रकरण पाहा
मुंबई : आयपीएलच्या 29 व्या सामन्यात चारवेळी चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई टीमला गुजरातने 3 विकेट्सने पराभूत केलं. गुजरातने या सामन्यात विजय मिळवला. गुजरातने 15 व्या हंगामात 6 पैकी 5 सामने जिंकले आहेत. गुजरात टीममधील एक स्टार खेळाडू मात्र सध्या चर्चेत आला आहे.
गेल्या काही सामन्यांमध्ये सर्वात जास्त फ्लॉप ठरलेल्या विजय शंकरवर नेटकरी आणि चाहत्यांनी संताप व्यक्त केला. विजय शंकरवरून सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहेत. युजर्सनी त्याच्या खराब फॉर्मवरून त्याला खूप ट्रोल केलं आहे.
चेन्नई विरुद्ध रविवारी झालेल्या सामन्यात त्याची कामगिरी अत्यंत वाईट होती. बॉलिंग आणि फलंदाजी दोन्हीमध्ये तो फ्लॉप ठरला. त्यानंतर चाहत्यांनी त्याला ट्रोल केलं. तू नक्की क्रिकेटर आहेस ना? याला 5 स्टारचा ब्रॅण्ड अॅम्बॅसिटर करा असे अनेक मीम्स सोशल मीडियावर फिरायला सुरुवात झाली.
गेल्या सामन्यासारखंच यावेळी धावांचं एकही खात न उघडता विजय शंकर तंबुत परतला. तर गोलंदाजी करण्याची संधी त्याला मिळाली नाही. त्याला 2019 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी दिली होती. मात्र त्याही वेळी तो फार चांगली कामगिरी करू शकला नाही.
विजय शंकरच्या खराब फॉर्मचा फटका गुजरात टीमला बसत आहे. यासोबत त्याच्या वाईट कामगिरीमुळे टी 20 वर्ल्ड कपसाठी तो स्वत: टीम इंडियाकडून खेळण्याचे दरवाजे बंद करत आहे.