मुंबई : लखनऊ विरुद्ध चेन्नई आज सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही टीम तयार आहेत. लखनऊ आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकते. तर चेन्नई देखील आपल्या टीममध्ये मोठा बदल करणार आहे. चेन्नई पहिला सामना कोलकाता विरुद्ध पराभूत झाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लखनऊ विरुद्ध सामना जिंकण्यासाठी चेन्नई आपल्या टीममध्ये महत्त्वाचा बदल करणार आहे. या सामन्यात मोईन अली टीममधून खेळताना दिसणार आहे. मोईन अली टीममध्ये आल्यानं चेन्नईला जिंकण्यासाठी बळ मिळेल. 


गेल्या सामन्यात डेवॉन कॉनवे फ्लॉप ठरला होता. त्याला आता बाहेर बसावं लागणार आहे. मोईन अलीनं गेल्या हंगामात खूप चांगलं प्रदर्शन केलं होतं. त्यामुळे आता मोईन अली टीममध्ये आल्याने चेन्नईला मोठा दिलासा मिळाला आहे. 


चेन्नई टीम संभाव्य प्लेइंग इलेव्हन


ऋतुराज गायकवाड, डेवोन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, मोईन अली, रवींद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी (विकेटकीपर), शिवम दुबे, ड्वेन ब्रावो, एडम मिल्ने आणि तुषार देशपांडे


लखनऊ संघ संभाव्य प्लेइंग इलेव्हन 


केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डि कॉक (विकेटकीपर), इविन लुइस, दीपक हुड्डा, आयुष बदोनी, क्रुणाल पंड्या, मनीष पांडे, मोहसिन खान/एंड्रयू टाय, आवेश खान, दुष्मंथा चमीरा आणि रवि बिश्नोई