मुंबई : गेल्या हंगामातील सर्वात स्ट्राँग आणि ट्रॉफी मिळवणाऱ्या टीमला नक्की झालंय तरी काय असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. धोनीनं कर्णधारपदावरू पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर सगळी गणितंच बदलली. कॅप्टन जडेजाला एकाही सामन्यात विजय मिळत नाही. पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नईला मोठ्या धावसंख्येनं पराभव स्वीकारावा लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IPL 2022 च्या 11व्या सामन्यात चेन्नईचा पंजाब टीमने 54 धावांनी पराभव केला. आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात झाल्यापासून चेन्नईचा हा सलग तिसरा पराभव आहे. सीएसकेने आयपीएलच्या याआधी कोणत्याही मोसमात इतकी खराब कामगिरी केली नव्हती. हा सामना हरल्यानंतर स्वतः जडेजा खूप संतापल्याचं पाहायला मिळालं. 


मला असं वाटतं की आम्ही पावर प्लेमध्ये खूप चांगले खेळलो नाही. आम्ही खूप विकेट्स गमावल्या. त्यामुळे खेळण्याची लय पकडू शकलो नाही. याचा तोटा टीमला झाला. आम्हाला अधिक चांगल्यापद्धतीनं फॉर्ममध्ये येण्यासाठी काम करावं लागेल असं चेन्नईचा कर्णधार जडेजा म्हणाला. 


रिटेन केलं आणि ठरला फ्लॉप
गेल्या हंगामात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा ऋतुराज गायकवाड यंदाच्या हंगामात सर्वात जास्त फ्लॉप ठरला. गायकवाडच्या कामगिरीवर जडेजानं प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, ''ऋतुराजचं मनोबल वाढवावं लागणार आहे. तो खूप चांगा खेळाडू आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मला खात्री आहे की तो चांगली कामगिरी करेल''


''शिवम दुबेने पुन्हा अर्धशतक झळकावले पण टीमला विजयाच्या जवळ आणता आला नाही. जडेजा म्हणाला, 'दुबे चांगली फलंदाजी करत आहे त्याचं मनोबल खचणार नाही यासाठी प्रयत्न करायचे आहेत.''


पंजाबचा कॅप्टन मयंक अग्रवालने आपल्या टीमचं तोंडभरून कौतुक केलं. तो म्हणाला, ''180 धावांचं आव्हान आमच्यासाठी सोपं नव्हतं. एकूणच बॉलिंग कमाल होती आणि मी लिव्हिंगस्टोनला काहीही बोललो नाही. तो फलंदाजी करतो तेव्हा सर्वांचे लक्ष असतं.वैभव अरोरानेही जितेश शर्माप्रमाणे डेब्यूमध्ये खूप चांगली कामगिरी केली. ''