Ipl 2024 CSK vs SRH head to head record:  आयपीएलच्या 17 व्या हंगामातील 46 वा सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबादमध्ये असणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर आज (28 एप्रिलला) संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. पॉईंट टेबलवर बोलायचं झालं तर चेन्नई सहाव्या क्रमांकावर तर हैदराबाद तिसऱ्या स्थानी आहे. पण या दोघांमधील सामन्यामुळे मात्र केकेआरची डोकेदुखी वाढणार आहे. कारण आज चेन्नई आणि हैदराबाद यांच्यामध्ये कोणताही संघ विजयी झाला तर केकेआरची पॉईंट टेबलमधून नंबर घसरणार आहे.  तर दुसरीकडे चेन्नईने यापूर्वीचे दोन्ही सामने गमावले आहेत. त्याचबरोबर सनरायझर्स हैदराबादची प्लेऑफची शर्यत किती कठीण बनत चालली आहे. एकंदरीत आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नई आणि हैदराबाद या दोन्ही संघांचा या हंगामातील 9  वा सामना असणार आहे. सनरायझर्स संघाने स्पर्धेत आतापर्यंत एकूण 8 सामने खेळले आहेत, ज्यात 5 जिंकले आहेत आणि गुणतालिकेत ते तिसऱ्या स्थानावर आहे. तर CSK संघाला 8 पैकी फक्त 4 सामने जिंकता आले आहेत आणि गुणतालिकेत 6व्या स्थानावर आहे. सलग दोन पराभवानंतर, गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विजयी मालिका परत मिळवण्यासाठी आतुर असेल. रविवारी चेन्नईचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली सीएसकेने चांगली सुरुवात केली, पण लखनौविरुद्ध त्यांना दोनदा पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्या घरच्या मैदानावरही चेन्नईला सुपरजायंट्सकडून पराभव पत्करावा लागला होता. 


हेड टू हेड आकडेवारी


चेन्नई आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर,  आयपीएलमध्ये एकूण 21 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये चेन्नई 15 सामने जिंकले आहेत, तर हैदराबादने 6 सामने जिंकले आहेत. . प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने 6 सामने जिंकले, तर हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 2 सामने जिंकले. नंतर फलंदाजी करताना चेन्नईने 9 सामने जिंकले आणि हैदराबादने 4 सामने जिंकले.


अशी असेल खेळपट्टी 


चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांचा बोलबाला आहे. चेंडू बॅटवर अडकतो आणि सीमारेषेपर्यंत पोहोचण्यासाठी फलंदाजांना खूप संघर्ष करावा लागतो. एम चिदंबरम स्टेडियममध्ये एकूण 110 सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या मैदानावर एकूण 76 आयपीएल सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये यजमान संघाने 51 सामने जिंकले आहेत, तर पाहुण्या संघाने 25 सामने जिंकले आहेत. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चालू मोसमात चार सामने खेळले आहेत, ज्यामध्ये चेन्नईने पहिले तीन सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत सनरायझर्स हैदराबादसाठी ही स्पर्धा कशी ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11


सनरायझर्स हैदराबाद: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट [इम्पॅक्ट सब: टी नटराजन]


चेन्नई सुपर किंग्ज: रुतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, मोईन अली, एमएस धोनी, दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिझूर रहमान, मथिशा पाथीराना [इम्पॅक्ट सब: शार्दुल ठाकूर]