मुंबई : हैदराबाद टीमला आधीच पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरताना आता 8.75 कोटींच्या स्टार खेळाडूनं पैशांवर पाणी फिरवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार हैदराबादचे पैसे पाण्यात गेल्याची चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टार खेळाडू वॉशिंग्टन सुंदर खेळण्यापेक्षा बेंचवरच जास्त बसला आहे. वॉशिंग्टनला सतत दुखापत होत असल्याने तो जास्तकाळ टीममध्ये खेळू शकला नाही. याचा मोठा फटका हैदराबाद टीमला बसला.


चेन्नई विरुद्धच्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला पुन्हा दुखापत झाली. फिल्डिंग दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे तो खेळू शकला नाही. टीमचे कोच टॉम मूडी यांनी दिलेल्या माहितीनुसार वॉशिंग्टनच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो बॉलिंग करू शकणार नाही. 


गुजरात विरुद्ध सामन्यात नुकतंच दुखापतीतून बरं होऊन मैदानात पुनरागमन केलं. मात्र चेन्नई विरुद्ध सामन्यात पुन्हा दुखापत झाली. दिल्ली विरुद्धच्या सामन्यात खेळण्याबाबत शंका आहे. 


सुंदरला झालेली दुखापत म्हणजे हैदराबाद टीमचं मोठं नुकसान आहे. पहिल्यांदा दुखापतीमधून पूर्ण बरा होऊन सुंदर मैदानात परतला होता. मात्र पुन्हा त्याच्या हाताला दुखापत झाली. सध्या त्याच्या हाताला टाके घालण्याची गरज नाही. मात्र तो बॉलिंग करू शकत नाही.