COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची सुवर्ण कामगिरी सुरुच आहे. शनिवारी भारताने उत्कृष्ट कामगिरीत करत तब्बल ७ सुवर्णपदकांची कमाई केली आहे. महिला टेबल टेनिस एकेरीमध्ये भारताच्या मनिका बत्राने सुवर्णपदक मिळवलं आहे.


ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंनी पदकांचा अक्षरशः पाऊस पाडलाय. भारताकडून मैदानात उतरवण्यात आलेल्या खेळाडूंनी त्यांच्या त्यांच्या क्रीडा प्रकारात जबरदस्त खेळ केलाय.


मेरी कोमनं जबरदस्त कामगिरी करत सुवर्णपदक मिळवलं. तिच्या पाठोपाठ पुरुषांच्या गौरव सोळंकीनं ५२ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. तर, नेमबाजीत तेजस्विनी सावंत प्रमाणेच ५० मीटर थ्री पोझिशनमधील पुरुषांच्या स्पर्धेत संजीव राजपूतनं यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील विक्रमासह सुवर्ण पदक मिळवलं. 


मैदानी खेळांमध्ये नीरज चोप्रानं ८६.४७ मीटर भालाफेक करून सुवर्ण पदकावर भारताची मोहर उमटवलीय. सुमित मलिकने कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रमक केलाय. त्याने १२५ किलो वजनी गटात ही सुवर्ण कामगिरी केलीय. दिवसातलं सहावं सुवर्णपदक विनेश फोगटनं पटकावलंय. 


शनिवारच्या दिवसातील सात सुवर्णपदकांमुळे भारताच्या खात्यात आतापर्यंत २४ सुवर्णपदकांची भर पडलीय.