नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण पदक आलं आहे. आतापर्यंत भारताने चार सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. भारताला वेटलिफ्टिंग स्पर्धेत हे चौथं सुवर्ण पदक मिळालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेटलिफ्टिंगमध्ये पुरुषांच्या ८५ किलो वजनी गटात भारताच्या वेंकट राहुलने सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. वेंकट राहुलने एकूण ३३८ किलोग्रॅम (१५१ किलो आणि १८७ किलो) वजन उचललं. शेवटच्या प्रयत्नात १९१ किग्रॅ वजन उचलण्याच्या प्रयत्नात राहुल अपयशी ठरला.


वेंकट राहुलने कारारा स्पोर्ट्स एरीना-१ मध्ये आयोजित क्लीन अॅन्ड जर्क स्पर्धेत ३३८ किलोग्रॅम वजन उचलत सुवर्ण पदक आपल्या नावावर केलं आहे.




भारताला आतापर्यंत सहा पदकं मिळाली आहेत ज्यापैकी चार सुवर्ण पदकं आहेत. ८५ किलो वजनाच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत वेंकट राहुलला सुवर्ण पदक, सामोआच्या डोन ओपेलोगे याला रजत आणि मलेशियाच्या मोहम्मद फाजरुल याला कांस्य पदक मिळालं.


पुरुषांच्या ७७ किलो वजनी गटात ३१७ किलो वजन उचलून शिवलिंगमने भीम पराक्रम करत भारताला तिसरं सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं.