CWG 2022 : कॉमनवेल्थ स्पर्धेत गेले ११ दिवस भारतीय खेळाडूंनी चांगला खेळ दाखवला आहे. ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दोन पदके जिंकणारी बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू हिने बॅडमिंटनमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेतील भारताचे हे 56 वे पदक आहे. त्याचबरोबर सिंधूचे राष्ट्रकुल स्पर्धेतील हे पहिले सुवर्णपदक आहे.


पीव्ही सिंधूने संपूर्ण सामन्यात अप्रतिम खेळ दाखवला. सिंधूने कॅनडाच्या मिशेल लीला टिकून राहण्याची संधी दिली नाही. ने पहिला गेम 21-15 असा जिंकला, त्यानंतर दुसरा गेम 21-13 असा जिंकला. सिंधूने सामन्यावर आपली पकड कायम ठेवली. दुसऱ्या गेममध्ये पीव्ही सिंधूने धमाकेदार खेळी करत  कॅनडाच्या खेळाडूला तिच्या पुढे जाण्याची संधी दिली नाही. सिंधूने दुसरा गेम २१-१३ असा जिंकून सुवर्णपदक जिंकले. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने कॅनडाची खेळाडू मिशेल लीला संधीट मिळू दिली नाही.