David Beckham Lunch With Mum : इंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू डेव्हिड बॅकहम (England footballer David Beckham) याची गेल्या काही दिवसापासून भारतात मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसते. आपल्या कलात्मक फुटबॉल शैलीमुळे डेव्हिड बॅकहम नेहमी चर्चेचा विषय असतो. अशातच आता डेव्हिड बॅकहम याने सोशल मीडियावर अनेकांचं मन जिंकलं आहे. डेव्हिड बॅकहम याने आपल्या आईसोबत फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तो भांडी घासताना दिसतोय. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य खूप काही सांगून जातं. किचनमध्ये त्याने आईसोबत (David Beckham With Mother) एक सेल्फी देखील घेतली. त्याने हेच फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेव्हिडची धाकटी बहीण जोआन लुईस, त्याची पत्नी व्हिक्टोरिया आणि त्यांची सर्वात लहान मुलं, क्रुझ आणि हार्पर यांच्यासह कुटुंबाने जेवणाचा आनंद घेतला आणि सुट्ट्यांचा आनंद लुटला. आईसोबत आज जेवण केलं, त्यावेळीचे काही हसरे क्षण.. डेव्हिडने त्याच्या धाकट्या बहिणीला, जोआन लुईसला वॉशअपमध्ये मदत न केल्याबद्दल हसून टोले देखील लगावले. सध्या त्याची हीच पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


पाहा पोस्ट



दरम्यान, फुटबॉलपटू डेव्हिड बॅकहम युनिसेफचा गुडविल अॅम्बेसेडर म्हणून भारतात आला होता. बॅकहम क्रिकेट वर्ल्डकप 2023 मधील भारत आणि न्यूझीलंड उपांत्य फेरीचा सामना पाहण्यासाठी मुंबईच्या वानखेडे स्टेडियवर उपस्थित होता. मुंबईत येण्यापूर्वी डेव्हिड बेकहॅम गुजरात दौऱ्यावर होता. तिथं त्याने युनिसेफकडून बालहक्क आणि लैंगिक समानतेच्या समर्थनासाठी जनजागृती केली.  बॅकहमने मुलांना शालेय शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मदत करणाऱ्या आणि बालविवाह, बालमजुरीचा विरोध करण्यासाठी सक्षम बनवणाऱ्या लोकांच्या भेटी घेतल्या होत्या.