मुंबई : कालच्या दिल्ली कॅपिट्लस आणि राजस्थान रॉयल्स यांच्या सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळला. अंपायरने दिलेल्या नो बॉलच्या निर्णयामुळे दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत चांगलाच संतापलेला दिसला. या सामन्यात राजस्थानने 15 रन्सने दिल्लीचा पराभव केला. मात्र या सामन्यात सध्या सर्वांचा लोकप्रिय असलेल्या डेव्हिड वॉर्नरची वाईट बाजू लोकांना पहायला मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीच्या टीमची फलंदाजी सुरु असताना डेव्हिड वॉर्नरने खुलेआम चिंटींग केली. यावरून सोशल मीडियावरून त्याच्यावर टीका होताना दिसतेय. इतकं होऊनही वॉर्नर अजून सुधारलेला नसल्याचं दिसून येतंय.


फलंदाजी करताना वॉर्नरकडून चिटींग


झालं असं की, दिल्ली फलंदाजी करत असताना राजस्थानकडून पाचवी ओव्हर प्रसिद्ध कृष्णा करत होता. यावेळी स्ट्राईकवर डेव्हिड वॉर्नर उभा होता. यावेळी प्रसिद्धच्या बॉलवर वॉर्नरने मोठा शॉट खेळायचा प्रयत्न केला. यावेळी बॉल वॉर्नरच्या बॅटच्या किनाऱ्याला लागून थेट विकेटकीपर संजू सॅमसनच्या हातात गेली.


प्रत्येकाला या गोष्टीमागील सत्य माहिती होतं. मात्र यावेळी वॉर्नरने आऊट झाल्यानंतर असं काही रिएक्शन दिलं की, जणू तो नॉट आऊट आहे आणि त्याला अंपायरचा निर्णय मान्य नाही. यावेळी तो पृथ्वी शॉला देखील रन घेण्यासाठी नकार देताना दिसला. 


डेव्हिड वॉर्नरचा व्हिडीयो पाहण्यासाठी इथे क्लिक करा


या घटनेनंतर अंपायरने वॉर्नरला आऊट दिलं आणि त्याच्या चेहऱ्याचा रंगचं उडाला. यावेळी वॉर्नर खूप निराश झाला आणि तसाच डगआऊटमध्ये निघून गेला. दरम्यान याचा व्हिडीयो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.