नवी दिल्ली :  हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअमवर शुक्रवारी भारत दौऱ्याच्या समाप्तीनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरने आपल्या प्रशंसकांना भावुक मेसेज पाठविला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी वॉर्नरने भारतीय समर्थकांना इन्स्टाग्रामवर लिहिले की आमचा पाहुणचार केल्याबद्दल सर्वांचे आभार....


आम्हांला भारतात येऊन क्रिकेट खेळणे खूप आवडते. हैदराबादमधील सामना रद्द झाल्याने आम्हाला माफ करा. मला आशा आहे की पुढील वर्षी आपली भेट नक्की होईल. 


 



वॉर्नर ऑस्ट्रेलियात जाऊन अॅशेज सिरीजची तयारी करणार आहे. पहिला सामना २३ नोव्हेंबर रोजी खेळणात येणार आहे. 


दुसरीकडे भारत न्यूझीलंडविरूद्ध २२ ऑक्टोबरपासून पहिला वन डे सामना खेळणार आहे.. दुसरा वन डे सामना २५ ऑक्टोबरला पुण्यात आणि तिसरा वन डे सामना २९ ऑक्टोबरला कानपूरमध्ये खेळला जाणार आहे.  त्यानंतर तीन टी-२० सामन्याची सीरीज खेळणार आहे.