David Warner : टीम इंडियाकडून (Team India) पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दोन्ही टी-ट्वेंटी सामन्यात (T20 Match) वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला क्लिन स्वीप दिला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दमदार प्रदर्शनाने ऑस्ट्रेलियन संघाने (Australia) आगामी T20 World Cup वर दावा ठोकला आहे. अशातच आता ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने मोठं वक्तव्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी खेळल्या गेलेल्या शेवटच्या T-20 सामन्यात सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (David Warner) सामनावीर तसेच मालिकावीराचा किताब पटकावला. या किताब मिळताच, डेव्हिड वॉर्नरने 11 वेळा सामनावीराचा किताब पटकावलाचा पराक्रम केला आहे. त्यामुळे जगातील सर्वोत्तम सलामीवीर (David Warner Opener) कोण? असा सवाल विचारला असता डेव्हिड वॉर्नरने जे उत्तर दिलं ते पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.


रोहितची (Rohit Sharma) बरोबरी करण्यापासून वॉर्नर फक्त एक पाऊल लांब आहे. त्यावर वॉर्नरला पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला असता, त्याने भारतीयांचं मन जिंकलं. रोहित शर्मा जगातील सर्वोत्तम सलामीवीर असल्याचं वॉर्नर म्हणाला. आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी (T20 World Cup) वॉर्नरचं वक्तव्य महत्त्वाचं ठरतंय.


आणखी वाचा - IND Vs SA : भारतीय संघात पुन्हा मोठा बदल, दुखापतग्रस्त दीपक चहरऐवजी 'या' खेळाडूला संधी मिळाली


डेव्हिड वॉर्नरने (David Warner) 11 वेळा सामनावीराचा किताब पटकावलाचा पराक्रम केला असला तरी भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने 12 वेळा मालिकावीर किताब मिळवला आहे. त्यामुळे रोहित शर्मा जगातील सर्वोत्तम सलामीवीर असल्याचं वॉर्नर म्हणाला. आगामी वर्ल्ड कपमध्ये दोन्ही खेळाडू कसे प्रदर्शन करतात, यावर सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे.