बंगळुरू : भारतविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियानं धावांचा डोंगर उभारला आहे. डेव्हिड वॉर्नर आणि ऍरोन फिंचच्या तुफानी खेळीमुळे ऑस्ट्रेलियानं ३६ ओव्हरमध्ये दोन विकेट गमावून गमावता २३० रन्सचा टप्पा ओलांडला आहे. डेव्हिड वॉर्नरनं त्याच्या १०० व्या वनडेमध्ये शतक झळकावलं आहे. ११९ बॉल्समध्ये १२४ रन्स करून डेव्हिड वॉर्नर आऊट झाला. तर ऍरॉन फिंचनं ९६ बॉलमध्ये ९४ रन्सची खेळी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी २३१ रन्सची पार्टनरशीप केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच वन-डे मॅचेसच्या सीरिजमध्ये पहिल्या तीन वन-डे मॅचेस जिंकत टीम इंडियाने सीरिज आपल्या खिशात घातली आहे. आता चौथी वन-डे मॅच जिंकत टीम इंडिया आपली विजयी घौडदोड कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे.


लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा