David Warner: आयपीएलच्या 16 व्या सिझनला (IPL 2023) अगदी दणक्यात सुरुवात झाली. मात्र दिल्ली कॅपिटल्ससाठी (Delhi Capitals) या सिझनची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. दिल्लीला सुरुवातीपासूनच सलग 5 सामन्यांमध्ये पराभवाचा धक्का बसला होता. अशातच दिल्लीच्या ड्रेसिंग रूममध्ये चोरी झाल्याची बातमी देखील समोर आली होती. मात्र अखेर आता दिल्ली पोलिसांच्या मदतीने हे सामना पुन्हा टीमला मिळू शकलंय. 


दिल्लीच्या ड्रेसिंग रूममध्ये झालेली चोरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी सामना झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंचं काही सामान चोरी झाल्याचं समोर आलं होतं. यानंतर याची पोलिसांत तक्रार करण्यात आली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची तपासणी करून चोरी झालेलं सामना पुन्हा मिळवून दिलं. दरम्यान दिल्ली पोलिसांची ही उत्तम कामगिरी पाहून दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेविड वॉर्नर (David Warner) त्यांचे आभार मानले आहेत. 


दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंच्या चोरी झालेल्या वस्तूंबाबत वॉर्नरने अपडेट दिलं आहे. वॉर्नरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं की, अखेर गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला. चोरलेल्या वस्तू परत मिळाल्या आहेत. हे ज्यांनी केलं होतं, ते सापडले आहे. मात्र अजूनही काही सामान गहाळ आहे.



महागड्या बॅट झालेल्या चोरी


मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंच्या एकूण 16 ते 17 बॅट्स गायब झाल्या होत्या. हरवलेल्या बॅटमध्ये 1 बॅटची किंमत लाखांपेक्षा जास्त असल्याची माहिती आहे. खेळाडूंच्या किट बॅगमधून 16 बॅट, पॅड्स, थाय पॅड्स, बूट आणि ग्लोव्ह्ज गायब झाल्याची माहिती होती. बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धचा सामना खेळल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये (Dressing Room) पोहोचले, त्यावेळी सामना गायब असल्याचं लक्षात आलं होतं.


गहाळ झालेल्या संपूर्ण सामानापैकी बहुतांश माल पोलिसांनी जप्त केलाय. मात्र अजूनही परंतु अद्याप काही सामान शिल्लक असल्याची माहिती आहे. दिल्ली पोलिसांचं अजूनही खेळाडूंचं चोरी झालेलं सामान शोधण्याचं काम सुरु आहे.


दिल्लीचा पहिला विजय


20 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला होता. अखेर या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने विजयाचं खातं उघडलं. दिल्लीने 4 विकेट्सने कोलकाता नाईट रायडर्सवर विजय मिळवला होता. कोलकात्याने 20 ओव्हर्समध्ये अवघे 127 रन्स केले. दरम्यान या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करणंही दिल्लीच्या टीमला कठीण गेलं. अखेर 19.2 ओव्हर्समध्ये 6 विकेट्स गमावत दिल्लीने हे लक्ष्य पूर्ण केलं.