IPL 2022: सलग तिसऱ्या विजयानंतरही के एल राहुल टीमवर नाराज
सलग तिसऱ्या विजयानंतरही के एल राहुलला या गोष्टीची खंत, पाहा काय म्हणाला....
मुंबई : आयपीएलच्या 15 व्या हंगामात गुरुवारी लखनऊ विरुद्ध दिल्ली सामना झाला. या सामन्यात लखनऊन टीमने 6 विकेट्सने दिल्लीवर मात केली. 4 सामन्यांमध्ये लखनऊचा हा तिसरा विजय आहे. लखनऊ टीम खूप चांगली कामगिरी करत आहे. मात्र तरीही के एल राहुल टीममधील खेळाडूवर नाराज असल्याचं दिसत आहे.
विजयानंतर के एल राहुलने टीममधील खेळाडूंचं कौतुक केलं. मात्र एक खेळाडू टीमसाठी अडचण ठरत असल्यानं नाराजीही व्यक्त केली. पावरप्लेमध्ये खेळण्याबाबत अजून अधिक काम करणं गरजेचं आहे. दिल्ली टीमने 3 गडी गमवून 149 धावा केल्या. तर लखनऊ टीमने 4 गडी गमावून 155 धावा केल्या.
दवाचा परिणाम सगळ्या टीमवर होत आहे. पण आम्हाला हे पक्क माहीत आहे की आम्हाला आमचं ध्येय गाठायचं आहे. गोलंदाज पावर प्लेमध्ये अजूनही कमी पडत असल्याचं कर्णधार के एल राहुलने म्हटलं आहे.
याआधी के एल राहुल पावर प्लेमधील फलंदाजीवर नाराज होता. या सामन्यात ती गोष्ट सुधारली मात्र गोलंदाजांवर अजून काम करणं गरजेचं असल्याचं के एल राहुलने म्हटलं आहे. लखनऊने गुजरात विरुद्धचा सामना गमवला. मात्र त्यानंतर चेन्नई, हैदराबाद आणि दिल्ली विरुद्ध सामना जिंकण्यात यश आलं आहे.
दवामुळे दिल्ली टीममध्ये गोलंदाजांना खेळणं कठीण जात होतं. आम्ही पावर प्लेमध्ये चांगले खेळलो मात्र नंतर धावांचं समीकरण बिघडलं. विजयासाठी 10 ते 15 धावा कमी पडल्या.