मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात ऋषभ पंतला मोठा झटका बसला आहे. लखनऊ विरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा 6 विकेट्सने पराभव झाला. यासोबत आणखी एक मोठा धक्का बसला. पंतला मोठा दंड भरावा लागला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IPL मध्ये कोड ऑफ कंडक्टच्या नियमानुसार ऋषभ पंतवर ओव्हर रेटसाठी दंडात्मक कारवाई करण्यात आली. पंतला 12 लाख रुपयांचा दंड भरावा लागला. आधीच पराभव आणि त्यामध्ये दंड भरावा लागल्याने दिल्ली टीमला मोठा धक्का बसला आहे. 


आयपीएलच्या 15 व्या हंगामात 7 एप्रिलपर्यंत 15 सामने खेळवण्यात आले. यादरम्यान ऋषभ पंत हा तिसरा कर्णधार आहे, ज्याला स्लो ओव्हर रेटमुळे दंड भरावा लागला. दिल्ली आणि मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 27 मार्च रोजी झाला. 


या सामन्यादरम्यान मुंबई टीमला दंड ठोठावण्यात आला. हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनलाही ३० मार्चला स्लो ओव्हररेटसाठी दंड भरावा लागला. आता दिल्लीचा कर्णधार पंतलाही दंड ठोठवण्यात आला आहे. 


दिल्ली, हैदराबाद आणि मुंबई टीमसाठी पहिली कारवाई दंडात्मक झाली आहे. पुन्हा या टीमकडून अशी चूक झाल्यास मोठी कारवाई होण्य़ाची शक्यता आहे. या तिन्ही टीमला सध्या आयपीएलमध्ये फार यश मिळत नाही. त्यामुळे या तिन्ही टीमला आता नियोजित वेळेत ओव्हर्स पूर्ण करण्याशिवाय कोणताही पर्यायही नाही.