त्रिनिदाद : टीम इंडिया आज वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा T20 सामना खेळणार आहे. पाच सामन्यांच्या T20I मालिकेत टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतलीय. आजच्या या टी20 सामन्याआधीच वेस्ट इंडिजच्या एका खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. या खेळाडूने सोशल मीडियावर इमोशनल पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्टइंडीजची ऑलराउंडर डिएंड्रा डॉटिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. डॉटिनने ट्विटरवर एक इमोशनल पोस्ट शेअर याबाबतची घोषणा केली आहे. डॉटिनला महिला ख्रिस गेल देखील म्हटले जाते. डॉटिन सध्या बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत बार्बाडोस संघाचा भाग आहे. हा संघ बुधवारी भारताविरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळणार आहे. या सामन्यातील विजयी संघ  उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित करेल.  


रेकॉर्ड
डॉटिनच्या नावावर महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत शतक ठोकण्याचा विक्रम आहे. 31 वर्षीय डॉटिनने 2010 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केवळ 38 चेंडूत शतक झळकावले होते.


निवृत्तीच्या पोस्टमध्ये काय? 
डॉटिन पोस्टमध्ये लिहले आहे की, 'माझ्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक अडथळे आले आणि मी त्यावर मात केली. सध्याचे सांघिक वातावरण असे नाही की मी खेळाची आवड जोपासू शकेन.मी दु:खी आहे पण या संघाच्या संस्कृतीशी आणि वातावरणाशी जुळवून घेण्यास मी सक्षम आहे याचे दु:ख नाही. मला आतापर्यंत मिळालेल्या संधीबद्दल मी कृतज्ञ आहे. हा निर्णय मी अत्यंत विचारपूर्वक घेतला आहे. मी 14 वर्षात कठोर परिश्रम केले आणि त्यामुळे मला शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या मजबूत बनवले.



कामगिरी
जून 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या डॉटिनने विंडीज संघासाठी 126 टी-20 आणि 143 एकदिवसीय सामने खेळले. एकदिवसीय सामन्यांमध्ये तिने 30.54 च्या सरासरीने 3 हजार 727 धावा केल्या आहेत. यात  तीन शतके आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचवेळी डॉटिनच्या नावावर टी-20 इंटरनॅशनलमध्ये 25.93 च्या सरासरीने 2 हजार 697 धावांची नोंद आहे. डॉटिनने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दोन शतके आणि 12 अर्धशतके झळकावली आहेत. डॉटिनने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 72 विकेट घेतले आहेत आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 62 विकेट मिळवले आहे.