Jointy roads सुद्धा अवाक होईल; इतका अप्रतिम झेल...पाहा Lady Jointy roads ची कमाल
वेस्ट इंडिजने इंग्लंडवर 7 रन्सने विजय मिळवला.
न्यूझीलंड : आयसीसीच्या महिला क्रिकेट वर्ल्डकपला सुरुवात झाली आहे. या टूर्नामेंटमध्ये काल इंग्लंड विरूद्ध वेस्ट इंडिज असा सामना होता. यावेळी वेस्ट इंडिजने इंग्लंडवर 7 रन्सने विजय मिळवला. मात्र या सामन्यादरम्यान प्रेक्षकांना लेडी रोड्स पहायला मिळाली. वेस्ट इंडिजच्या डियांड्रा डॉटिन हिने एक असा कॅच पकडला ज्यामुळे सर्वजण पाहातच राहिले.
इंग्लडंची फलंदाज विनफील्ड हिलचा हा कॅच डॉटिनने पकडला. यानंतर क्रिकेटच्या इतिहासात उत्तम कॅच पकडणाऱ्यांच्या यादीत तिचा समावेश झाला आहे. इंग्लंड विरूद्ध वेस्ट इंडिजच्या 9 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर विनफील्डने बॅकवर्ड पॉईंटवर एक कट शॉट खेळला. रोमांचक झालेल्या या सामन्यात वेस्टइंडिजने अखेर बाजी मारत इंग्लंडचा पराभव झाला.
बॉल जेव्हा बॅटवर लागला तेव्हा असं वाटलं की, बॉल बाऊंड्री पार करेल. मात्र त्याचवेळी डॉटिनने तिची चपळाई दाखवत हवेत उडी घेत डाव्या हाताने सुंदर असा कॅच घेतला.
विनफील्ड हिलने 27 बॉलमध्ये 12 रन्स केले. मात्र डॉटिनने टिपलेल्या कॅचची सर्वात जास्त चर्चा होतेय. वेस्ट इंडिजने न्यझीलंडविरूद्धचा पहिला सामना जिंकला होता.