मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने तिचा आतापर्यंतचा टीम इंडियाचा सगळ्यात आवडता खेळाडू कोण? याचे उत्तर दिलं आहे. दीपिकाचं स्वत: खेळाशी जवळचं नातं आहे. दीपिकाचे वडिल प्रकाश पदुकोण हे भारताच्या सर्वोत्तम बॅडमिंटनपटूंपैकी एक आहेत. दीपिकादेखील ८३ या चित्रपटात काम करत आहेत. ८३ हा चित्रपट क्रिकेटपटू कपिल देव यांच्या कारकिर्दीवर आधारित आहे. या चित्रपटात दीपिकाने कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांची भूमिका केली आहे. तर दीपिकाचा नवरा रणवीर सिंगने कपिल देव यांची व्यक्तीरेखा साकारली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मी आणि रणवीर वेळ मिळेल तेव्हा क्रिकेटच्या मॅच बघतो. रणवीरला फूटबॉलप्रमाणेच क्रिकेटही पाहायला आवडतं. आम्ही प्रत्येक मॅच बघत नसलो तरी महत्त्वाच्या मॅच न चुकता बघतो. क्रिकेटच्या मॅच आम्ही कुटुंब किंवा मित्रांसोबत पाहतो,' असं दीपिका म्हणाली आहे.


'भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड हा माझा सगळ्यात आवडता खेळाडू आहे, असं दीपिकाने सांगितलं आहे. राहुल द्रविड हा माझ्यासाठी आदर्श आहे. तो बंगळुरुचा आहे, असं वक्तव्य दीपिकाने केलं.