मुंबई : टीम इंडियाच्या महिला खेळाडूंनी इंग्लंडचा पराभव करत 3-0 असा व्हाईटवॉश दिला. तिसऱ्या सामन्यात इंग्लंड विजयाच्या उंबरठ्यावर असताना दीप्ती शर्माने (Deepti Sharma) मंकडिंग पद्धतीने चार्ली डीनला (Charlotte Dean) नॉन-स्ट्रायकर असताना रनआऊट करत हा विजय मिळवला. या रनआऊट नंतर चार्ली डीनचा रडतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे ती चर्चेत आली होती. मात्र तुम्हाला माहितीय का इंग्लंडची ही रडूबाई सौंदर्यवती आहे.तिचे फोटो पाहून तुम्ही थक्क व्हाल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीप्ती शर्माने (Deepti Sharma) मंकडिंग पद्धतीने चार्ली डीनला (Charlotte Dean) आऊट केल्यानंतर तिचा ऱडतानाचा फोटो चर्चेत आला होता. हा फोटो पोस्ट करून अनेकांनी टीम इंडियाने चिंटींग केल्याचा आरोप केला होता. मात्र टीम इंडियाच्या (Team India) दिग्गज खेळाडूंनी देखील त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. दरम्यान इंग्लंडची चार्ली डीन तिच्या उत्कृष्ट खेळासह तिच्या लुकसाठी प्रसिद्ध आहे. तिचे अनेक चाहते आहेत.  



कोण आहे चार्ली डीन?
इंग्लंडची महिला क्रिकेटर चार्ली डीनचे (Charlotte Dean)पूर्ण नाव शार्लोट अॅलन डीन आहे. तिचा जन्म 22 डिसेंबर 2000 रोजी बर्टन अपॉन ट्रेंट, स्टॅफोर्डशायर काउंटी येथे झाला. चार्लीला क्रिकेटशी ओळख तिचे वडील स्टीव्हन यांनी करून दिली होती. स्टीव्हन स्वत: एक क्रिकेटपटू आहेत, त्यांनी स्टॅफोर्डशायर आणि वॉरविकशायरसाठी 'जंटलमन्स गेम' खेळला आहे. चार्ली डीनने 16 सप्टेंबर 2021 रोजी न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 



चार्ली डीन (Charlotte Dean) ही जगातील सर्वात सुंदर आणि गोंडस महिला क्रिकेटपटूंपैकी एक मानली जाते. या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महिला ऍशेस टी-20 मालिकेसाठी इंग्लंड संघात तिची निवड झाली तेव्हा ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती.