दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणी काही संपेना; स्टार खेळाडू रूग्णालयात दाखल
टीमच्या स्टार खेळाडूला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मुंबई : टीममधील खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह येत असल्याचा धक्का असतानाच दिल्ली कॅपिटल्सच्या टीमला अजून एक मोठा धक्का बसला आहे. टीमच्या स्टार खेळाडूला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ताप येत असल्याने त्याला रूग्णालयात दाखल केलं आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा ओपनर पृथ्वी शॉला ताप येत असल्याने रूग्णालयात दाखल केलं आहे. दरम्यान रूग्णालयात भर्ती केल्यानंतर त्याची तब्येत सुधारली असून तो लवकरच खेळण्यासाठी मैदानावर उतरणार असल्याची माहिती आहे.
सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध झालेल्या सामन्याच्या प्लेईंग 11 मध्येही पृथ्वी शॉचा समावेश करण्यात आला नव्हता. त्याच्या जागी टीममध्ये मनदीप सिंगचा समावेश करण्यात आला होता. रविवारी पृथ्वीला ताप येत असल्याने टीमच्या मेडिकल स्टाफमध्ये त्याला रूग्णालयात भर्ती करण्याचा सल्ला दिला.
पृथ्वी शहाची तब्येत गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती. टीममधील एक नेट गोलंदाज कोरोना पॉझिटीव्ह असल्याची बातमी समोर आली होती. अशा परिस्थितीत सर्व खेळाडूंची पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली. सगळ्या खेळाडूंचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर इतर सामन्यांचं आयोजन करण्यात आलं. यापूर्वी देखील दिल्ली कॅपिटल्सच्या टीममधील काही खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं समोर आलं होतं.