मुंबई : दिल्लीच्या टीमला आयपीएलचा ११ वा सीझन वाईट जाणार अस दिसतय. टीमच्या सलग हाराकारीला कंटाळून गौतम गंभीरने कॅप्टनसी सोडली. आता नवा झटका ख्रिस मॉरीसच्या रूपात लागला आहे. मॉरीसच्या जागी साऊथ आफ्रिचा फास्ट बॉलर ज्यूनियर डालाला आयपीएल ११ मध्ये निवडण्यात आलयं. आयपीएलतर्फे शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या प्रेस रिलीजमध्ये यासंदर्भात घोषणा करण्यात आली.  डालाने भारत आणि आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून आपल्या आंतरराष्ट्री क्रिकेट करियरला सुरूवात केली. त्याने आतापर्यंत ३ मॅचमध्ये आपल्या टीमच प्रतिनिधित्व केलय. दिल्लीच्या टीममध्ये मॉरीसच्या जागेवर खेळणारा डाला ३ नंबरची जर्सी घालून मैदानात उतरेल. श्रेयश अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ शुक्रवारी कोलकाताच्या संघाला भिडणार आहे. फिरोज शाह कोटला मैदानात हा सामना रंगणार आहे.


हा प्लेयर ठरतोय अयशस्वी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमध्ये दिल्लीचा फास्ट बॉलर मोहम्मद शमी हा अयशस्वी ठरत आहे. शमीच्या या अपयशाचं कारण दिल्लीचा प्रशिक्षक जेम्स होप्स यानं सांगितलं आहे. वैयक्तिक आयुष्यातल्या समस्यांमुळे शमी अपयशी होत असल्याचं जेम्स होप्स म्हणालाय. २८ वर्षांचा मोहम्मद शमी गेल्या काही दिवसांपासून वादात सापडला आहे. शमीची पत्नी हसीन जहांनं त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले आहेत. याप्रकरणी शमीविरोधात पोलिसांमध्ये तक्रारही दाखल झाली आहे. तसंच कोलकात्यामध्ये पोलिसांनी शमीची चौकशीही केली आहे.


अपघातामध्ये शमी जखमी


एकीकडे पत्नीसोबत वाद सुरु असतानाच रस्ते अपघातामध्ये मोहम्मद शमी जखमी झाला होता. या अपघातामुळे आयपीएलआधी शमीला सरावही करता आला नाही. हसीन जहांनं शमीवर मॅच फिक्सिंगचे आरोपही लगावले पण बीसीसीआयनं चौकशी करून शमीला क्लिन चीट दिली. यानंतरच शमीला आयपीएल खेळण्यासाठी हिरवा कंदील मिळाला.


शमीला वेळ द्यावा लागेल


शमीच्या आयुष्यात सध्या वाद सुरु आहेत. त्यामुळे क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करणं त्याला कठीण होत आहे. त्याच्या आयुष्यातलं हे वादळ शमेल तेव्हाच तो क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करु शकेल. यासाठी शमीला थोडा वेळ द्यावा लागेल, अशी प्रतिक्रिया जेम्स होप्सनं दिली आहे.