या क्रिकेटरच्या वडिलांची हत्या, परदेश दौऱ्यातून माघार
श्रीलंका क्रिकेट संघाचा फलंदाज धनंजय डी सिल्वा यांच्या वडिलांची गोळी मारुन हत्या करण्यात आलीये. यामुळे धनंजय आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यात खेळू शकणार नाहीये.
कोलंबो : श्रीलंका क्रिकेट संघाचा फलंदाज धनंजय डी सिल्वा यांच्या वडिलांची गोळी मारुन हत्या करण्यात आलीये. यामुळे धनंजय आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यात खेळू शकणार नाहीये. ईसपीएनक्रिक इन्फो डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, गुरुवारी रात्री एका अज्ञात व्यक्तीने धनंजयच्या वडिलांची गोळ्या घालून हत्या केली. श्रीलंकेच्या पोलिसांनीही या वृत्ताला दुजोरा दिलाय. धनंजयचे वडिल रंजन डि सिल्वा यांची कोलंबोच्या दक्षिणेकडील राथमलाना येथे गोळी घालण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच धनंजय तात्काळ कालुबोलिया रुग्णालयात पोहोचला.
धनंजयच्या मॅनेजमेंट टीमने शुक्रवारी त्याच्या वतीने दुखद संदेश जाहीर केला. मला सांगण्यास दु:ख होतय की कालच्या रात्री(गुरुवारी) माझ्या वडिलांची हत्या करण्यात आली. हे सगळं कसोटी मालिका आणि वेस्ट इंडिजच्या महत्त्वाच्या दौऱ्याआधी घडलंय.
श्रीलंका क्रिकेटचे अध्यक्ष थिलंगा सुमाथिपाला यांनी धनंजयचे मेसेजद्वारे सात्वंन केलेय. या कठीण काळाता श्रीलंका क्रिकेट धनंजय आणि त्याच्या कुटुंबियांच्या पाठिशी आहे.
याआधी श्रीलंका क्रिकेटने आपल्या मेसेजद्वारे धनंजय आणि कुटंबाचे सांत्वन केलेय.
दरम्यान, या घटनेमुळे श्रीलंका संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर काही परिणाम होणार नाहीये. मात्र काही योजना बदलल्या जाऊ शकतात.