Dhanashree Verma Bikini Dance: भारतीय टीमचा स्पिनर गोलंदाज युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) ची पत्नी धनश्री (Dhanashree Chahal) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी तिच्या डान्यच्या माध्यमातून तर कधी तिच्या मजेशीर रील्समधून ती चाहत्यांसमोर येते. अशातच आता धनश्रीचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युझीची पत्नी धनश्री ही डान्सर आहे. मात्र ती कोणत्याही हिरोईनीपेक्षा कमी नाहीये. धनश्री तिचा हॉटनेस आणि फीटनेस हा चाहत्यांसाठी सध्या चर्चेता विषय आहे. धनश्रीने 26 फेब्रुवारी रोजी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने एका बिकीनीमध्ये डान्स केला आहे. मात्र यावेळी चाहत्यांना एक प्रश्न आहे, तो म्हणजे धनश्रीसोबत असलेला हा व्यक्ती कोण? 


Dhanashree Chahal च्या डान्सने चाहते धाले क्लीन बोल्ड 


युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) ची पत्नी धनश्री (Dhanashree Verma) सोशल मीडियाची क्विन मानली जाते. तिच्या डान्सचे एनेक व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. रविवारी तिने तिच्या एका डान्सचा व्हिडीओ शेअर केलाय. चाहत्यांना तिच्या या नव्या डान्सचा व्हिडीओ खूप आवडला आहे. 


नव्या व्हिडीओमध्ये धनश्री खूप सुंदर आणि हॉट दिसतेय. या व्हिडीओमध्ये युझी देखील शर्टलेस होऊन तिच्यासोबत डान्स करतोय. मात्र यावेळी याच व्हिडीओमध्ये धनश्री अजून एका व्यक्तीसोबत डान्स करताना दिसतेय. 


कोण आहे हा व्यक्ती?


धनश्रीने केलेल्या डान्सने चाहत्यांचं मन जिंकून घेतलं आहे. मात्र या व्हिडीओमध्ये असलेल्या व्यक्तीवरून चांगलीच चर्चा रंगली आहे. धनश्रीसोबत डान्स करणारा हा व्यक्ती तिचा जवळचा असल्याची माहिती आहे. 



श्रेयससोबतचा धनश्रीचा व्हिडिओ व्हायरल


यापूर्वी धनश्रीने एका व्हिडीओमध्ये टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर सोबत डान्स केला होता. श्रेयसने देखील या दोघांचा हा डान्स सोशल मीडियावर शेअर केला आहे. दरम्यान या व्हिडीओनंतर दोघांचं अफेअर असल्याची चर्चा देखील रंगली होती.