मुंबई : टीम इंडियाचा लेगस्पिनर युझवेंद्र चहल त्याच्या मस्तीखोर स्वभावासाठी ओळखला जातो. चहल इंस्टाग्रामवर मजेदार रील शेअर करून चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. नुकत्याच पार पडलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये चहलने 17 सामन्यात एकूण 27 विकेट घेत पर्पल कॅप मिळवली. IPL 2022 ची एकमेव हॅट्ट्रिक युझवेंद्र चहलने (KKR विरुद्ध) घेतली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा देखील आयपीएलच्या संपूर्ण हंगामात स्टँडवरून राजस्थान रॉयल्स (RR) ला चिअर्स करताना दिसली. जेव्हा तिला तिच्या पतीच्या 'सुंदर हास्य'बद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, कारण तो त्याच्या पहिल्या प्रेमाच्या (क्रिकेट) आसपास आहे. राजस्थान रॉयल्स (RR) द्वारे आयोजित केलेल्या पॉडकास्टवर बोलताना, धनश्रीने उघड केले की युझवेंद्र चहल मैदानावरील तणाव दूर करण्यासाठी नेहमी हसत असतो.


धनश्री म्हणाली, 'खरं सांगायचं तर युजी खूप रसिक आहेत आणि त्याला क्रिकेट आवडतं. त्याचे पहिले प्रेम क्रिकेट आहे, त्याच्या नेहमी हसतमुख आणि सुंदर हसण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याच्या सहकाऱ्याच्या आजूबाजूचे वातावरण. ज्यात तुम्हाला समतोल राखण्याची गरज असते. वातावरण नक्कीच खूप मैत्रीपूर्ण आहे, परंतु ते तणावपूर्ण देखील असते.



धनश्री म्हणाली, 'जेव्हा लोकं आयपीएल, कसोटी किंवा एकदिवसीय सारखा कोणताही खेळ पाहण्यासाठी येतात तेव्हा ते तणावग्रस्त असतात कारण ते एखाद्या संघाला समर्थन देतात. तुमची टीम चांगली कामगिरी करत असल्याचे तुम्हाला नक्कीच पहायचे असते. त्यामुळे तणावाचं वातावरण असतं.