Dhanashree Verma Instagram Post With This Man Goes Viral:  भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलची पत्नी आणि प्रसिद्ध युट्यूबर धनश्री वर्मा सध्या टीकेची धनी ठरत आहे. सोशल मीडियावर धनश्रीने शेअर केलेल्या एका फोटोवरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. धनश्रीने तिच्या मित्राबरोबर शेअर केलेल्या एका फोटोमुळे चहलचे चाहते चांगलेच नाराज झाले आहेत. चहलने आपल्या मैत्रीणीबरोबर असं काही केलं असतं तर धनश्रीची प्रतिक्रिया कशी असती? असा सवाल विचारत चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.


फोटोत दिसणारी व्यक्ती कोण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनश्रीचा मित्र आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक प्रतिक उतेकरबरोबर धनश्रीने शेअर केलेला एक फोटो वादाचा विशय ठरत आहे. धनश्री आणि प्रतिक हे दोघेही नुकतीच सांगता झालेल्या, 'झलक दिखला जा सिझन 11' मध्ये एकत्र दिसले होते. याच कार्यक्रमाच्या फिनाले पार्टीमध्ये धनश्री आणि प्रतिकचा हा फोटो क्लिक करण्यात आला आहे. या फोटोत प्रतिक आणि धनश्री एकमेकांशी गरज नसताना अंगलट करत असल्याचं चाहत्याचं मत आहे. 
फोटोत नेमकं काय आहे?


फोटोत काय आहे?


फोटोत प्रतिक धनश्रीच्या पाठीमागे उभा असून तो धनश्रीला मागून मिठी मारताना दिसत आहे. प्रतिकने फोटोसाठी पोज देताना धनश्रीच्या गालाला गाल लावला आहे. धनश्रीने लाजून डोळे बंद करतात त्याप्रमाणे फोटोसाठी पोज दिली आहे. प्रतिकनेच हा फोटो शेअर केला आहे.



अन्य एकाने 'चहलसाठी मला वाईट वाटतंय' असं म्हणत पुरुष असणं फार कठीण असल्याचं म्हटलं आहे.



कोणत्याही नवऱ्याला वाईट वाटेल



या फोटोवर धनश्री किंवा युजवेंद्र चहल अथवा प्रतिक उतेकरने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया नोंदवलेली नाही.