मॅनचेस्टर : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये भारताचा शानदार विजय झाला आहे. कुलदीप यादवनं घेतलेल्या ५ विकेट आणि लोकेश राहुलच्या शतकामुळे भारतानं ही मॅच ८ विकेटनं जिंकली. ३ मॅचच्या या सीरिजमध्ये भारतानं १-०ची आघाडी घेतली आहे. या मॅचमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. इंग्लंडनं चांगली सुरुवात केल्यानंतर कुलदीप यादवच्या स्पिन बॉलिंगपुढे इंग्लंडच्या बॅट्समननी लोटांगण घातलं. इंग्लंडला २० ओव्हरमध्ये १५९ रनवर रोखण्यात भारतीय बॉलरना यश आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१६० रनचा पाठलाग करताना शिखर धवन लवकर आऊट झाला. पण लोकेश राहुल आणि रोहित शर्मानं भारताची पडझड होऊ दिली नाही. नंतर विराट कोहलीनं रन बनवून भारताला विजय मिळवून दिला. या मॅचमध्ये विकेट कीपर महेंद्रसिंग धोनीनंही एक रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केलं आहे.


कुलदीप यादवच्या बॉलिंगवर धोनीनं लागोपाठ दोन स्टम्पिंग केले. यानंतर आंतरराष्ट्रीय टी-२० मॅचमध्ये सर्वाधिक स्टम्पिंग करण्याचं रेकॉर्ड धोनीनं केलं आहे. धोनीच्या नावावर आता ३३ स्टम्पिंग आहेत. याआधी हे रेकॉर्ड पाकिस्तानच्या कामरान अकमलच्या नावावर होतं. कामरान अकमलनं ३२ स्टम्पिंग केले आहेत.


धोनीनं ९१ आंतरराष्ट्रीय टी-२० मॅचमध्ये धोनीनं ३३ स्टम्पिंग आणि ४९ कॅच सोबत ८२ विकेट घेतल्या आहेत. टी-२० मध्ये स्टम्पिंग घेण्याच्या यादीमध्ये २८ स्टम्पिंगसह मोहम्मद शहजाद तिसऱ्या, २६ स्टम्पिंग घेऊन मुशफिकुर रहमान चौथ्या आणि २० स्टम्पिंगसह कुमार संगकारा पाचव्या क्रमांकावर आहे.


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या तिन्ही प्रकारांमध्ये (वनडे, टेस्ट आणि टी-२०) धोनी आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ७७८ बळी घेतले आहेत. या यादीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाऊचर(९९८) पहिल्या आणि ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट (९०५) दुसऱ्या क्रमांकावर आहे.