दोन वेगवेगळ्या भाषेत गप्पा मारत आहे धोनीची मुलगी झिवा, पाहा व्हिडिओ
धोनीने शेअर केला व्हिडिओ
मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव असतो. मुलगी झिवासोबतचे फोटो आणि व्हिडिओ तो नेहमी शेअर करत असतो. धोनी सध्या टीम इंडियाच्या बाहेर आहे. त्याला विश्रांती देण्यात आली आहे. धोनीने झिवा सोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धोनी झिवासोबत गप्पा मारत आहे. पण धोनीची मुलगी ही हिंदीमध्ये नाही तर दोन वेगवेगळ्या भाषेत बोलत आहे.
धोनीने हा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्याचे फॅन्स देखील या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत. धोनीची मुलगी झिवा दोन वेगवेगळ्या भाषेत बोलत आहे. धोनी बेडवर झोपला आहे. आणि झिवा त्याच्यासोबत बोलताना भोजपुरीमध्ये त्याला प्रश्न विचारत आहे. 'ऐ महेंद्र सिंह धोनी कैसन बा?' यावर उत्तर देताना धोनी म्हणतो की, ठीक बा. यानंतर धोनी आणि झिवा तमिळ भाषेत बोलतात.
भोजपुरी धोनीची मातृभाषा आहे. तर धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो. त्यामुळे त्याला तमिळ भाषा देखील जमते.