सिमला : भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी बायको साक्षी आणि मुलगी जीवासोबत सिमल्यामध्ये आहे. सिमल्यात धोनी रस्त्यावर बुलेट फिरवताना दिसला. धोनीला हिमाचल प्रदेश सरकारनं राज्य अतिथीचा दर्जा दिला आहे. धोनी सिमल्यामध्ये क्रिकेट स्पर्धा खेळायला नाही तर वैयक्तिक कारणासाठी आला आहे. सिमल्यामध्ये धोनी एका जाहिरातीचं शूटिंग करत आहे. यावेळी धोनी ब्राऊन रंगाचं जॅकेट घालून बुलेट चालवताना दिसला.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महेंद्रसिंग धोनी चार्टर प्लेननं हिमाचलमध्ये आला आहे. धोनीला आणि त्याचं कुटुंब फाईव्ह स्टार हॉटेल वाईल्ड फ्लॉवरमध्ये राहत आहे. धोनी सिमल्यामध्ये ५ दिवस राहणार आहे. ३१ ऑगस्टला तो पुन्हा घरी परतेल.



१५ सप्टेंबरपासून युएईमध्ये आशिया कपला सुरुवात होणार आहे. त्याआधी धोनी हिमाचलमध्ये कुटुंबासोबत सुट्टी एन्जॉय करतोय. १७ जुलैला इंग्लंडविरुद्धची वनडे सीरिज संपल्यानंतर धोनी भारतामध्ये परत आला.