मुंबई : महेंद्रसिंग धोनीने 2008 साली भारतीय संघाचं कर्णधारपद स्वीकारलं होतं. धोनीने टीमचं कर्णधारपद स्वीकारलं तेव्हा त्याच्यासमोर अनेक आव्हानं होती. जसं की तरुणांना संधी देणं आणि भविष्यासाठी टीमची बांधणी करणं इत्यादी. त्या सर्व आव्हानांचा सामना करताना धोनीने भारतीय टीमला अनेक ऐतिहासिक क्षण दिले.


धोनीने का दिली होती कर्णधारपद सोडण्याची धमकी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2008 मध्ये धोनीने कर्णधारपद सोडण्याची धमकी दिल्याची बातमी आली होती. त्यानंतर आलेल्या वृत्तानुसार, निवड समितीच्या बैठकीची माहिती लीक झाली होती. 


मिळालेल्या माहितीनुसार, धोनीने निवड समितीला आरपी सिंगऐवजी इरफान पठाणचा संघात समावेश केल्यास कर्णधारपद सोडण्याची धमकीही दिली होती. 2008 मध्ये, एका मीडिया रिपोर्टमध्ये हे उघड झालं होतं की, धोनीने आरपी सिंगऐवजी इरफान पठाणच्या निवडीबद्दल असहमती दर्शविली होती. 


सिलेक्टर्सने आरपी सिंगच्या जागी इरफान पठाणची निवड करण्यास सांगितलं तेव्हा धोनीने कर्णधारपद सोडण्याचं सांगितलं होतं.


आरपी सिंह इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं सत्य


आरपी सिंह यांने एका मुलाखतीत या प्रकरणाची संपूर्ण सत्यता सांगितली होती. आरपी सिंग म्हणाला की, महेंद्रसिंग धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली संघ निवडण्याच्या बाबतीत कधीही पक्षपातीपणा केला नाही. 


आरपी सिंगच्या म्हणण्यानुसार, महेंद्रसिंग धोनी असा कर्णधार नव्हता, जो संघ निवडताना हे लक्षात ठेवतो की त्याची कोणत्या खेळाडूशी मैत्री आहे.