मुंबई : आयपीएल 2022 आता शेवटच्या टप्प्यात आहे. आयपीएलमध्ये कालच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. दरम्यान सीएसकेची टीम या वर्षी प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर गेल्याने, प्रत्येकाच्या मनात सर्वात मोठा प्रश्न आहे की, धोनीची ही शेवटची आयपीएल आहे का? याचा खुलासा खुद्द धोनीने त्याच्या शेवटच्या सामन्यात केला आहे.


पुढच्या वर्षीही सीएसकेसाठी खेळणार धोनी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी धोनीने एक मोठा खुलासाही केला की, सीएसकेसाठी हा त्याचा शेवटचा सामना नाही. 


धोनी म्हणाला, "एका छोट्या कारणामुळे, माझा शेवटचा सामना चेन्नईत न खेळणं आणि चाहत्यांचे आभार मानणं हे अन्यायकारक ठरेल. मुंबई ही अशी जागा आहे जिथे मला एक टीम म्हणून खूप प्रेम आणि पाठिंबा आहे."


पुढच्या वर्षी कमबॅक करणार


धोनी पुढे म्हणाला, 'हे माझं शेवटचं वर्ष आहे की नाही हा एक मोठा प्रश्न नाही. कारण तुम्हाला माहित आहे की, आपण दोन वर्षांनंतर काहीही सांगू शकत नाही. पण पुढच्या वर्षी जोरदार पुनरागमन करण्यासाठी मी नक्कीच मेहनत करेन.


कालच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सवर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. चेन्नईने राजस्थानला विजयासाठी 151 रन्सचं आव्हान दिलं होतं. राजस्थानने हे विजयी आव्हान 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. या विजयासह राजस्थानने प्लेऑफमध्ये धडक मारली आहे.