मुंबई : आयपीएल 2020 मध्ये एमएस धोनीची टीम चेन्नई सुपर किंग्ज चांगली कामगिरी करु शकली नाही. आयपीएलमध्ये यंदा चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये देखील प्रवेश करू शकला नाही, असे या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच झाले होते. सीएसके 3 वेळा या टी-20 लीगचा चॅम्पियन बनला आहे, परंतु यावर्षी त्याची कामगिरी एखाद्या विजेत्यासारखी नव्हती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोणीची वैयक्तिक कामगिरीही खूप खराब होती, त्याने या हंगामात केवळ 200 धावा केल्या आणि यादरम्यान एकही अर्धशतक झळकावले नाही, हे कोणत्याही मोसमातील माहीची सर्वात वाईट कामगिरी आहे. यानंतर धोनीच्या आयपीएलमधून निवृत्ती घेतल्याच्या अफवा उडू लागल्या.


मात्र, पुढच्या वर्षीही चेन्नईचे नेतृत्व करणार असल्याचे विधान करून धोनीने आपल्या समर्थकांना सुखद धक्का दिला. डॅनी मॉरिसनने धोनीला विचारले की किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धचा सामना शेवटचा सामना होता का? त्याने उत्तर दिले, 'निश्चितच नाही'.


मात्र तरी अशी शक्यता वर्तविली जात आहे की धोनी चेन्नई सुपर किंग्जचं कर्णधारपद सोडू शकतो आणि आता तो फक्त एक खेळाडू म्हणून खेळू शकतो. संघ व्यवस्थापनाला आता कर्णधारपदासाठी नवा चेहरा शोधावा लागेल. जर खरंच धोनीने कर्णधारपद सोडलं तर पुढच्या मोसमात फाफ डु प्लेसिसला या संघाची जबाबदारी दिली जाऊ शकते.


भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज प्रशिक्षक संजय बांगर यांनीही ड्यू प्लेसीला कर्णधारपद देण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, 'धोनीने 2011 नंतरही भारताची कर्णधारपदाची धुरा सांभाळली. धोनीला ठाऊक होते की यापुढे गोष्टी सारख्या नसतील. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये खराब कामगिरीनंतर आमच्याकडे धोनीचा पर्याय नव्हता. पण विराट कोहलीने चांगली कामगिरी केली तेव्हा धोनीने कसोटी क्रिकेटचा कर्णधारपद सोडलं.'


संजय बांगर म्हणाले की, 'पुढच्या सत्रात त्याने यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून भाग घ्यावा आणि कर्णधारपद सोडावे. ड्यू प्लेसीला संघाची कमान मिळविण्यात धोनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. कोणतीच टीम अशा खेळाडूला रिलीड करण्यासाठी तयार नाही, जो सीएसकेचा कर्णधार होऊ शकतो.' सध्या सीएसकेकडे कर्णधारपदासाठी कोणताही पर्याय नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात जर धोनीने कर्णधारपद सोडलं तर कोण कर्णधार होतं हे पाहावं लागेल.