मुंबई : ऑस्ट्रेलियाचा वनडे सीरिजमध्ये ४-१नं पराभव आणि त्याआधी श्रीलंकेचा ९-०नं पराभव केलेली भारतीय टीम ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी सज्ज झाली आहे. या सीरिजआधी भारतीय टीम रिलॅक्स मूडमध्ये पाहायला मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

७ ऑक्टोबरला धोनीचं होम ग्राऊंड असलेल्या रांचीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली टी-20 मॅच होईल. या मॅचआधी धोनी त्याच्या घरी आहे. घरामध्ये कुत्र्यासोबत मस्ती करतानाचा एक व्हि़डिओ, साक्षी धोनीनं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.



धोनीबरोबरच रोहित शर्मानंही त्याच्या कुत्र्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. बुधवारी वर्ल्ड अॅनिमल डे होता, यानिमित्त धोनी आणि रोहित शर्मानं त्यांच्या कुत्र्यांचे व्हिडिओ शेअर केले आहेत.