मुंबई : गेल्या अनेक सीरिजपासून यशस्वी कामगिरी करत असलेली भारतीय टीम ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात मालिका खेळण्यास सज्ज झाली आहे. या सीरिजआधी भारताच्या दोन खेळाडूंनी आपला नवा लुक समोर आणला आहे. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आणि विकेटकीपर महेंद्रसिंग धोनी या सीरिजमध्ये आपल्याला नव्या लूकमध्ये पाहायला मिळतील. या दोन्ही खेळाडूंनी आपला नवा लूक असलेला फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीची हेअरस्टाईल



धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासूनच आपल्या चाहत्यांना त्याच्या लांब केसाने भुरळ पाडली होती. आता धोनीच्या या नव्या हेअर स्टाईल लूक बद्दलची माहिती त्याची हेअरस्टाइलिस्ट सपना मोटवाणीने दिली आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरुन हे फोटो शेअर केले आहेत. धोनीवर ही हेअरस्टाईल शोभून दिसत आहे. नवीन हेअरस्टाईल केल्यानंतर धोनीने आपल्या चाहत्यांसोबत काही फोटो काढले आहेत. ज्यात तो फुटबॉल खेळताना पाहायला मिळत आहे.


 


रोहित शर्मा  


भारताचा विस्फोटक बॅट्समन मुंबईकर रोहित शर्माने आपला लूक बदलला आहे. या नव्या रुपात तो चांगलाच उठून दिसत आहे. या फोटोतून तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. रोहित शर्माला न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी-२० सीरिजमध्ये भारताला विजय मिळवून देता आला नाही. पण या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्ये चांगली कामगिरी करण्याचा मानस रोहितचा असेल. 


 



ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका सुरु होण्यास अवघ्या ४ दिवसांचा अवधी आहे. भारतीय टीम आधी टी-२० सीरिज आणि मग वनडे सीरिज खेळेल. ही सीरिज वर्ल्ड कपच्या दृष्टीने महत्त्वाची असणार आहे. वर्ल्ड कपआधी भारताची ही शेवटची सीरिज आहे.