मुंबई : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोन या दिवसांत रांचीमध्ये आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. धोनीने सध्याच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो आपल्या फार्महाऊसवर कुत्र्यांसोबत मस्ती करताना दिसत आहे. आपल्या या पेट्सबद्दल धोनीने लिहिलं आहे की, थोडं जवळ घ्यायचं, ट्रेनिंग, कोचिंग, प्रॅक्टिस आणि त्या बदल्यात भरपूर प्रेम... अनमोल आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीला महागड्या बाइक्स आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या कुत्र्यांची आवड आहे. कुत्र्यांना अगदी जवळ घेऊन तो त्यांच्यावर भरभरून प्रेम करतो. हा व्हिडिओ बघून पुन्हा एकदा अधोरेखित होतं की, तो एक उत्तम माणूस आहे. माहीचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर 25 लाखहून अधिक वेळा लोकांनी पाहिला आहे 



धोनी आपल्या इंस्टाग्राम अकांऊटवर झियाचे देखील व्हिडिओ शेअर करत असतो. काही दिवसांपूर्वी पापा, चांगले आहेत की वाईट... असा झियाचा व्हिडिओ शेअर केला होता. साक्षी झिवाला विचारते की, 'झिवा, पापा चांगले आहेत की वाईट?' तेव्हा तात्काळ उत्तर येतं. 'तुम्ही सगळे चांगले आहात'. एवढंच काय तर झिवा या उत्तराला एकसारखं बोलत होती. या व्हिडिओत साक्षी दिसत नाही. पण धोनी त्या फुग्यांसोबत मस्ती करताना दिसत आहे. आणि मस्तीमध्ये झिवावर फुगे उडवत आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर 17 लाख लोकांनी पाहिला आहे.